Marathi News> विश्व
Advertisement

पत्नीच्या 40 व्या बर्थडे पार्टीत, 'कपडे काढून' नाचला झुकरबर्ग; VIDEO VIRAL

तूफान व्हायरल होतोय मार्क झुकरबर्गचा हा व्हिडीओ... पत्नीला हे असं सरप्राईज देत पार्टी गाजवणारा मार्क पाहून नेटकरी म्हणतायत Men Will be Men... 

पत्नीच्या 40 व्या बर्थडे पार्टीत, 'कपडे काढून' नाचला झुकरबर्ग; VIDEO VIRAL

Mark Zuckerberg Viral Video: 'My Wife...' हे असं म्हणत आपल्या पत्नीचं कौतुक करत, तिला प्रेमानं न्याहाळणारा क्रिकेटपटू विराट कोहली आठवतोय? जीवनातील आनंदाचा काळ असो किंवा मग आव्हानात्मक दिवस... प्रत्येक वळणावर फक्त विराटच नव्हे तर अनेक पुरुष मंडळींसाठी आधार असते ती म्हणजे त्यांची पत्नी. कधी हीच पत्नी अर्धांगिनी असते, तर कधी मैत्रीण, कधी ती आधार होण्याचं काम करते तर कधी हीच पत्नी एखाद्या लहान मुलासारखं वागत जगणं किती सुंदर आहे हेसुद्धा दाखवून देते. 

पुरुष मंडळींच्या जीवनातील या 'पत्नी' नामक व्यक्तीचं अस्तित्वं हे संधी मिळेल तेव्हा साजरा होणंही तितकंच महत्त्वाचं. जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या आणि Meta ची मालकी असणाऱ्या मार्क झुकरबर्गलाही अगदी तसंच वाटतं. विश्वास बसत नाही? त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ नक्की पाहा. हा व्हिडीओ अतिशय खास आहे, कारण त्यात पाहायला मिळतोय एका पार्टीचा जल्लोष. 

ही पार्टी आहे मार्कच्या पत्नीच्या 40 व्या वाढदिवसाची. पत्नी प्रिसिला चॅन हिच्या वाढदिवसाला तिला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी म्हणून मार्कनं स्वत:च पार्टीमध्ये परफॉर्म केलं. यावेळी त्याची एंट्री अतिशय धडाकेबाज होती असं म्हणायला हरकत नाही. मार्क इथं पार्टीसाठी सूटबूट अशाच लूकमध्ये पोहोचला आणि थेट त्यानं स्टेज गाठला. बस्स, तिथं पोहोचल्यावर काय? टक्सीडो काढून त्यानं चकाकणाऱ्या जांभळ्या जंपसूटमध्ये आपला परफॉर्मन्स दिला. 2025 मधील ग्रॅमी सोहळ्यात बेन्सन बून यानं हाच जंपसूट घालत 'ब्यूटीफुल थिंग्स'वर परफॉर्म केलं होतं. पण, इथं मार्कचा अंदाज पाहूनच प्रिसिला थक्क झाली. 

हेसुद्धा वाचा : हे आहेत नेपाळचे अंबानी; भारतात ठिकठिकाणी विकलं जातं त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट, श्रीमंतीचा आकडा पाहाच...

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mark Zuckerberg (@zuck)

मार्क ज्या क्षणी पार्टीत पोहोचला त्या क्षणापासून तिथं उत्साहाचं वेगळंच रुप अनेकांनी पाहिलं. पत्नीवरील प्रेमापोटी किंबहुना आपल्या प्रेमाच्या माणसासाठी, त्या व्यक्तीच्या आनंदासाठी अनेक मंडळी चौकटीबाहेर जात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि इथं मार्कनंही तेच केलं. 'बायको एकदाच 40 वर्षांची होते...' असं कॅप्शन देत त्यानं या खास क्षणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि त्याच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडला. मार्कचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी गमतीनं म्हणाले, Men Will be Men....

Read More