Marathi News> विश्व
Advertisement

झुकरबर्गने लाइक केला लॉरेनचा सुंदर फोटो; नेटकऱ्यांनी दोघांची सर्व डिजिटल हिस्ट्रीच काढली!

Mark Zuckerberg and Jeff Bezos:  मार्क झुकरबर्ग यांना जेफ बेझोस यांची होणारी पत्नी लॉरेन सांचेझकडे पाहत असल्याचे पाहिले आणि चर्चांना उधाण आले.

झुकरबर्गने लाइक केला लॉरेनचा सुंदर फोटो; नेटकऱ्यांनी दोघांची सर्व डिजिटल हिस्ट्रीच काढली!

Mark Zuckerberg and Jeff Bezos: आजकाल सोशल मीडियात काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कोणाचे तरी फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हायरस होताना आपण पाहिले असतील. पण आता फेसबुक म्हणजेच मेटाचा निर्माता मार्क झुकरबर्ग याचेच फोटो सोशल मीडियात व्हायरल केले जातायत. तसेच त्याचे डिजिटल फूटप्रिंटही शोधले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपासून सुरु झालेले हे प्रकरण सोशल मीडिया यूजर्स चवीने चघळताना दिसतायत.    

सोशल मीडिया यूजर्स शेरलॉक होम्सपेक्षा कमी नाहीत. कारण त्यांना फक्त एक फोटो हवा असतो आणि त्यांच्या कृत्यांची संपूर्ण कहाणी समोर आणतात, त्यावर चर्चा करत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा जगभरात चर्चेत राहिला पण सोशल मीडियात त्यादिवशी वेगळाच व्हिडीओ चर्चेत आला.अनेकांनी मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांना जेफ बेझोस यांची होणारी पत्नी लॉरेन सांचेझकडे पाहत असल्याचे पाहिले. यामुळे अनेकांनी झुकरबर्गच्या डिजिटल फूटप्रिंटचा खोलवर जावून शोध लावला आहे. आता यावर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

झुकरबर्गने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोहळ्यानंतर इंस्टाग्रामवर लॉरेन सांचेझच्या एका सुदर फोटोला लाईक केले होते. सोशल मीडिया यूजर्सने खूप खोलवर सर्च करुन हे लाईक शोधले आहे. आता यावरुन झुकरबर्गला ऑनलाइन ट्रोलिंग सुरु केले आहे. 

या फोटोत  लॉरेन सांचेझ पीच रंगाच्या डोल्से अँड गब्बाना गाऊनमध्ये दिसतेय. हा ड्रेस तिच्या उद्घाटन कार्यक्रमांत परिधान केलेल्यापैकी एक होता. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चे अनेक फोटो शेअर केले होते.  ज्यावर तिच्या फॉलोअर्सकडून अनेक लाईक्स आणि कमेंट्स केल्या जात आहेत. 

पण सोशल मीडियावरील यूजर्सना स्नेचेझच्या लाईक्स कॉलममध्ये झुकरबर्गचे नाव लगेचच लक्षात आले. 'आता झुकरबर्ग लाईकचा पर्याय खासगी बनवेल' अशी कमेंट एका युजरने केलीय.'म्हणूनच त्याने फेसबुक आणि इन्स्टा वर कधीही कम्युनिटी नोट्स सुरु केले नाही',अशी कमेंट्स दुसऱ्या एका युजर्सने केली आहे. 

एका युजरने यात झुकरबर्गची बाजू घेतली आहे. तो म्हणतो, 'नाही, झुकरबर्गने लाईक बटण लोकांशी 'मैत्रीपूर्ण' राहण्यासाठी शोधले होते, त्यांच्याशी 'फ्लर्ट' करण्यासाठी नाही, हे तो तुम्हाला आठवण करुन देतोय. पण तुमच्यापैकी काही असुरक्षित लोकांच्या डोक्यात ते घुसलेले दिसत नाही.', असे युजर्सने म्हटले. 

आकर्षक ड्रेसमुळे सांचेझ सोशल मीडियात चर्चेत राहिली. पण असा पेहराव शपथविधी समारंभासाठी योग्य आहे का? असा प्रश्नही अनेक यूजर्स विचारत आहेत. असे असताना तिच्या पोशाखापेक्षा भरसमारंभात झुकरबर्ग तिच्याकडे पाहत असतानाच्या फोटोची चर्चा जास्त रंगली होती. या फोटोवर अनेक विनोदी कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

Read More