Marathi News> विश्व
Advertisement

Earthquake : पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप, तिबेटमध्येही जाणवले हादरे

Earthquake News : 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु झालेलं भूकंपांचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. जगातील विविध देशांमध्ये महाभयंकर भूकंप येत असल्यामुळं सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.   

Earthquake : पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप, तिबेटमध्येही जाणवले हादरे

Earthquake News : तुर्कीमध्ये आलेल्या अतीप्रचंड भूकंपातून हा देश सावरण्याचे प्रयत्न करत असतानाच जगभरातील इतर राष्ट्रांमध्ये येणाऱ्या भूकंपांनी सर्वांचीच चिंता वाढवली आहे. तिथं तुर्की, अफगाणिस्तान, पाकिस्तान या भागांत आलेल्या भूकंपानं भीतीचं वातावरण पसरवलेलं असतानाच आता पापुआ न्यू गिनी आणि तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी भल्या पहाटे इथं धरणीकंप जाणवला. (massive earthquake strikes papua new guinea and tibet latest updates in marathi)

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार तिबेटमधील शिजांग येथे रविवारी रात्री 1.12 वाजण्याच्या सुमारास धरणीकंप जाणवण्यास सुरुवात झाली. ज्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. अद्यापही इथून कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची माहिती समोर आलेली नाही. 

हेसुद्धा पाहा : Hot Air Balloon हवेत असतानाच लागली आग, प्रवाशांनी 50 ते 100 फुटांवरुन मारल्या उड्या; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

तिबेटमध्ये भूकंपाचे हादरे जाणवण्याआधी पपुआ न्यू गिनी इथं तब्बल 7.3 रिश्टर स्केल इतक्या प्रचंड तीव्रतेचा भूकंप आला. रविवारी रात्री 11. 34 वाजता हा भूकंप आल्याची माहिती प्राथमिक स्तरावर समोर येत आहे. दरम्यान, इथं भूकंपानंतर कोणत्याही प्रकारच्या त्सुनामी किंवा तत्सम संकटाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. किंबहुना तेथील नुकसानाचीही आकडेवारी समोर आलेली नाही. 

भारतातही भूकंपाचे हादरे? 

1 एप्रिलला भारताच्या अंदमान आणि निकोबार बेट समूहांतील पोर्ट ब्लेअर येथे 4.0 इतक्या तीव्रतेचा भूकंप जाणवला. शुक्रवारी रात्री 11.56 वाजण्याच्या सुमारास हा भूकंप आल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीकडून देण्यात आली. तर, रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मध्य प्रदेशातील जबलपूर येथे 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. पचमढी येथून 218 किमी अंतरावर हा भूकंप जावल्याची माहिती समोर आली. 

का येतात भूकंप? 

भूगर्भशास्त्रज्ञांच्या माहिती आणि अभ्यासानुसार पृथ्वीच्या उदरात सात टेक्टोनिक प्लेट्स म्हणजेच थर आहेत. हे थर सातत्यानं फिरत असतात. ज्यावेळी हे थर एकमेकांवर आदळतात, एकमेकांवर येतात किंवा त्यांचं घर्षण होतं तेव्हा धरणीकंप जाणवू लागतो. याची तीव्रता जास्त असल्यास तो भूकंपामध्ये परावर्तित होतो. 1 ते 9 इतक्या रिश्टर स्केल या परिमाणात भूकंप मोजला जातो. भूकंप त्याच्या केंद्रबिंदूपासून दूर जातो तसतशी त्याची तीव्रताही कमी होते. 

 

 

Read More