Marathi News> विश्व
Advertisement

कोरोनाबाबत अगणित भाकीतं करणाऱ्या Bill Gates यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोना नियंत्रणात येत असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात असतानाचं,मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स (Bill Gates) यांनी भाकित केले होते. या भाकितामध्ये त्यांनी जगाला मोठा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या काही दिवसानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बिल गेट्स यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली.  

कोरोनाबाबत अगणित भाकीतं करणाऱ्या Bill Gates यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई : कोरोना नियंत्रणात येत असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात असतानाचं,मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स (Bill Gates) यांनी भाकीतं केले होते. या भाकितामध्ये त्यांनी जगाला मोठा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या काही दिवसानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बिल गेट्स यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली.  

बिल गेट्स (Bill Gates) यांनी ट्विटमध्ये म्हटलेय,  कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive)आढळलो असलो तरी सौम्य लक्षणे आहेत. सध्या आयसोलेट असून बरा होत नाहीत तोपर्यंत एकाकी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

“मी भाग्यवान आहे की मला लसीकरण करण्यात आले आहे आणि मी बूस्टर देखील घेतला आहे आणि मला चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. असे बिल गेट्स म्हणालेत. 

बिल गेट्सचा जगाला इशारा 

बिल गेट्स (Bill Gates) म्हणाले की, आतापर्यंत आपल्याला सरासरीच्या 5 टक्क्यांपेक्षा जास्त धोका जाणवलेला नाही. कोरोनाचा अधिक संसर्गजन्य आणि अधिक घातक व्हेरिएंट येण्याचा धोका आहे. त्यामुळे या महामारीचा सर्वात वाईट टप्पा अजून पाहायचा बाकी आहे.

Read More