Marathi News> विश्व
Advertisement

मॉडेलने शरीरांच्या अशा भागावर काढला टॅटू, की रेखाटताना डोळ्यातून पाणी

जे मुलांना आणि घरच्यांना आवडले नाही. 

  मॉडेलने शरीरांच्या अशा भागावर काढला टॅटू, की रेखाटताना डोळ्यातून पाणी

Shocking news : टॅटू असलेली मुलगी या ओळखीच्या हव्यासापोटी मॉडेलने संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर 40 हून अधिक टॅटू काढले. ओखम या छोट्या शहरात राहणारी, 23 वर्षीय एमी स्मिथ हिने स्वतःला वेगळे बनवण्यासाठी इतके टॅटू काढल्याने तिला ओळखणे कठीण झाले होते. एकदा तर तिची मुलेही तिला ओळखू शकली नाहीत आणि रडू लागली.

आता एमी शरीराच्या इतर काही भागांवर टॅटू बनवत आहे, त्या दरम्यान तिला खूप वेदना सहन कराव्या लागल्या. चेहऱ्यावर टॅटू काढणे इतके सोपे नाही, असे तिचे म्हणणे आहे. चेहरा ही एक अतिशय संवेदनशील आणि नाजूक जागा आहे.

परंतु नवीन अनुभवांसह, एमी सांगते की टॅटूसाठी सर्वात वेदनादायक आणि नाजूक जागा चेहरा नसून काहीतरी वेगळे आहे. शरीराच्या त्या भागावर टॅटू काढण्यासाठी सुया टोचताना तिच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यामुळे ही प्रक्रियामध्येच थांबवावी लागली.

एमीला टॅटू थेरपी खूप आवडते. तरीही, जेव्हा तिने कॉलरबोनपासून हनुवटीपर्यंत टॅटू काढण्यास सुरुवात केली तेव्हा तिची प्रकृती अधिकच बिघडली.

तो काळ असह्य वेदनांचा होता. शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू गोंदवावा असे तिला वाटत नव्हते. कारण त्या काळात तिला फक्त आरामात बसायचे होते. मग ती काही खात-पिऊन सुद्धा नव्हती, बोलत ही नव्हती.

पण कॉलरबोनच्या वेळी तिला विशिष्ट पद्धतीने मान ओढून बसावे लागले, त्या दरम्यान तिला काहीही बोलता येत नव्हते आणि काही पिताही येत नव्हते. एकाच स्थितीत बसताना मान ताठ झाली होती. थुंकी गिळता ही येत नव्हती.

'असे घडले की थोड्या वेळाने माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि टॅटू पूर्ण होण्यापूर्वी मला सत्र थांबवावे लागले असं ती म्हणाली.

fallbacks

एमी स्मिथने 40 टॅटू बनवले आहेत. वयाच्या 13 व्या वर्षी तिने पहिला टॅटू काढला. आपल्या सावत्र वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिने पायावर हत्तीचा टॅटू बनवला. हळूहळू टॅटूचे प्रेम पायापासून चेहऱ्यापर्यंत पोहोचले. एमीने एक प्रयोग म्हणून चेहऱ्याचा टॅटू बनवला होता.

जे मुलांना आणि घरच्यांना आवडले नाही. यामुळे तिचा आत्मविश्वास तुटला. पण तिला चांगलं वाटलं जेव्हा शहरातील लोक तिला टॅटू असलेली मुलगी म्हणून संबोधतात. या ओळखीने तिला हवा असलेला आत्मविश्वास परत दिला. आता ती तिचा प्रयोग यशस्वी मानते आणि आनंदी आहे.

 

 

Read More