Marathi News> विश्व
Advertisement

जगातील सर्वात महागडं झाड, 1000 रुपयांचे रोपटं बनेल 7 कोटी रुपयांचे झाड; 1 मीटर लाकडाची किंमत ऐकून व्हाल हैराण!

Most expensive wood:   जर तुमची गावात किंवा शहरात कुठेही जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

जगातील सर्वात महागडं झाड, 1000 रुपयांचे रोपटं बनेल 7 कोटी रुपयांचे झाड; 1 मीटर लाकडाची किंमत ऐकून व्हाल हैराण!

Most expensive wood: जर तुमची गावात किंवा शहरात कुठेही जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्ही तुमच्या खासगी जमिनीवर अनेक झाडे लावली असतील पण असेही एक झाड आहे, जे तुम्हाला करोडपती बनवू शकते. बहुतांश जणांना या झाडाबद्दल माहिती नसेल. हे जगातील सर्वात महागडे झाड मानले जाते. त्यामुळे हे झाड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय असेल. 

आपण आफ्रिकन ब्लॅकवुडबद्दल जाणून घेतोय. या झाडाच्या लाकडाचा वापर महागडे फर्निचर आणि वाद्ये बनवण्यासाठी केला जातो. हे झाड खूपच मजबूत असते. ज्यामुळे उच्च दर्जाच्या लाकडी वस्तू बनवण्यासाठी त्याची मागणी खूप जास्त असते. पण या रोपाला झाड बनण्यासाठी खूप वेळ लागतो. इतके पेशन्स कोणामध्ये नसतात. त्यामुळे या झाडाची लागवड करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी त्याची लागवड केली जाते त्या ठिकाणी त्याच्या संरक्षणासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. कारण चंदनाच्या लाकडाइतकेच त्याचाही काळाबाजार केला जातो. या कारणांमुळे कोणीही या झाडाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

या झाडाला आफ्रिकन ब्लॅकवुड किंवा डालबर्गिया मेलानॉक्सिलॉन असेही म्हणतात. ते टांझानिया, मोझांबिक आणि केनियासारख्या पूर्व आफ्रिकन देशांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते. या झाडाचे लाकूड अत्यंत दाट, मजबूत आणि टिकाऊ असते. गडद काळा किंवा काळा-तपकिरी रंगांमुळे हे झाड इतर लाकडांपेक्षा वेगळे दिसते. आफ्रिकन ब्लॅकवुडचा वापर प्रामुख्याने क्लॅरिनेट, बासरी, ओबो आणि बासून यांसारखी उच्च दर्जाची वाद्ये बनवण्यासाठी केला जातो. त्याची ध्वनी गुणवत्ता इतकी उत्कृष्ट असते की त्याला म्युझिकल वूड असेही म्हणतात. यासोबतच महागडे फर्निचर, आलिशान दागिने, शिल्पे आणि सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो. हे लाकूड त्याच्या ताकदी, उत्तम फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या क्षमतेमुळे अत्यंत महाग मानले जाते.

भारतातील आफ्रिकन ब्लॅकवुडची स्थिती आणि किंमत

आफ्रिकन ब्लॅकवुड भारतात नैसर्गिकरित्या आढळत नाही. काही संशोधन संस्था आणि निवडक खासगी रोपवाटिकांमध्ये त्याची रोपे प्रायोगिकरित्या वाढवली जातात. पण त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात नाही. त्याच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारचे उष्ण आणि कोरडे हवामान, कमी पाऊस आणि विशेष माती आवश्यक असते. जे आफ्रिकन भागात आढळते. आफ्रिकन ब्लॅकवुडचा एक छोटासे रोप भारतात सुमारे 1 हजार ते 5 हजार रुपयांना खरेदी करता येते. पण त्याची उपलब्धता खूपच मर्यादित आहे. 

एक झाड प्रोढ होण्यासाठी 50-60 वर्षे लागतात. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति घनमीटर सुमारे 8 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंत असते. 1 घनमीटर लाकूड म्हणजे 1 मीटर लांब, रुंद आणि जाड. या संपूर्ण झाडाची किंमत 7-8 कोटी रुपये असू शकते. हे झाड भारतात आयात करायचे असेल तर त्यात जड कस्टम ड्युटी आणि लॉजिस्टिक्स खर्च जोडला जातो. त्यामुळे खर्च आणखी वाढतो.

या झाडाचे लाकूड अत्यंत दाट आणि मजबूत असते, त्यामुळे ते तुटत नाही किंवा वाकत नाही. ते खूप कमी ठिकाणी उपलब्ध होते.  एका झाडाची वाढ होण्यासाठी दशके लागतात. म्हणजेच पुरवठा खूपच मर्यादित असतो. उच्च दर्जाच्या वाद्यांमध्ये या झाडाच्या खोडाला पर्याय नाही. अनेक देशांनी या झाडाच्या कापणी आणि निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत.

Read More