Marathi News> विश्व
Advertisement

माणसासाठी दुसरी पृथ्वी तयार? दुसऱ्या पृथ्वीचा शोध लागला?

परग्रहावर वस्ती, अंतराळातील इतर ग्रहांवर जीवन असल्याचं आपण आतापर्यंत केवळ सिनेमात पाहिलं असेल, पण आता ही कल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे  

माणसासाठी दुसरी पृथ्वी तयार? दुसऱ्या पृथ्वीचा शोध लागला?

NASA Discovers SEcond Earth : परग्रहावर वस्ती आहे, अंतराळात आणखी ग्रह आहेत ज्यावर जीवन अस्तित्वात आहे.. यावर आतापर्यंत शेकडो सिनेमा बनलेत, अनेकदा शास्त्रज्ञांनी संशोधन झालंय. पण आता या कल्पना सत्यात उतरु शकतात. कारण शास्त्रज्ञांनी दुसऱ्या पृथ्वीचा शोध (Discovers Second Earth) लावला आह. हा ग्रह अगदी हुबेहुब पृथ्वीसारखाच दिसतो. नासानं (NASA) आतापर्यंत जी माहिती गोळा केलीय त्यानुसार

नासाने पृथ्वीसारखा दिसणारा एक ग्रह (Planet) शोधलाय जो पृथ्वीपासून सुमारे 100 प्रकाश वर्ष दूर आहे. एका छोट्या ताऱ्याभोवती हा ग्रह फिरतोय. या ग्रहाचं नाव TOI 700 E असं आहे. हा एक डोंगराळ ग्रह आहे. ज्याचा आकार पृथ्वीच्या 95% आहे. M बौने ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालताना या ग्रहाचा शोध लागला. 16 दिवसात हा ग्रह एक ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.

fallbacks

fallbacks

fallbacks

fallbacks

या ग्रहासारखे आणखी तीन ग्रह नासाला मिळालेत. त्यामुळे ही ग्रहांची मालिका असू शकते. पृथ्वीपासून फक्त 100 प्रकाशवर्ष दूर पृथ्वीसारखा ग्रह मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे तिथे जीवसृष्टी अस्तित्वात आहे का यावर संशोधन सुरु झालंय.

Read More