Marathi News> विश्व
Advertisement

पृथ्वीचा चंद्र नाहीसा होणार? प्रचंड वेगाने लघुग्रह धडकणार? जनजीवनावर काय परिणाम होणार?

will Asteroid Hit Moon ? : चंद्रावर हा प्रचंड ताकदीचा स्फोट झाल्यानंतर पृथ्वीवर कसा होणार त्याचा परिणाम? शास्त्रज्ञांनाही मोठी चिंता..   

पृथ्वीचा चंद्र नाहीसा होणार? प्रचंड वेगाने लघुग्रह धडकणार? जनजीवनावर काय परिणाम होणार?

will Asteroid Hit Moon ? : अवकाशातील अनेक घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासानं सातत्यानं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात संपूर्ण जगाला सतर्क केलं. याच NASA नं आता एक अशी गोष्ट अवकाशात टीपली आहे, जी चंद्रासाठी धोकादायक ठरू शकते. नासा आणि जगभरातील अवकाश संशोधकांसाठी चिंतेत भर टाकण्याचं कारण ठरत आहे तो म्हणजे चंद्राच्या दिशेनं प्रचंड वेगानं सरसावणारा एक लघुग्रह. 

पृथ्वीचा चंद्र नाहीसा होणार? असं काय घडणार? 

 साधारण 7 वर्षांनंतर म्हणजेच 2032 मध्ये पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्रावर हा लघुग्रह दक्षिणी गोलार्धामध्ये धडकण्याची शक्यता आहे. ज्याचा आकार जवळपास 175 ते 220 फूट इतका असून त्याचा आकार एखाद्या 15 मजली इमारतीइतका असल्याचं सांगण्यात येत आहे. नासाच्या अवकाशातील अद्ययावत आणि सर्वोत्तम अशा जेम्स वेब दुर्बिणीच्या माध्यमातून चंद्राच्या दिशेनं येणाऱ्या या लघुग्रहाला टीपण्यात आलं. मार्च महिन्यात हे दृश्य टिपण्यात आलं असून, त्याच्या पृष्ठावर ओबडधोबड दगडासम वस्तूसुद्धा पाहायला मिळत आहेत. 

चंद्रावर धडकणाऱ्या लघुग्रहाचा पृथ्वीलाही धोका? 

नासानं जारी केलेल्या माहितीनुसार चंद्राला या लघुग्रहाचा धोका असला तरीही पृथ्वीला त्याचा फार धोका नसून, संभाव्य धोकासुद्धा 4 टक्के असल्याचं म्हटलं जात आहे. प्रत्यक्षात जर हा लघुग्रह चंद्रावर आदळल्यास तिथं एक मोठ्या आकाराचा खड्डा निर्माण होऊ शकतो. ज्यामुळं 5000 वर्षांमधील ही सर्वात मोठी खगोलीय घटना ठरू शकते. 

प्राथमिक स्वरुपातील निरीक्षणावरून Asteroid 2024 YR4 चा सर्वाधित धोका पृथ्वीला असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नव्यानं कक्षांची गणती झाल्यानंतर पृथ्वीचा धोका कमी झाल्याचं स्पष्ट झालं, तर चंद्राचं अस्तित्वं मात्र धोक्यात आलं. 

हेसुद्धा वाचा : विमानतळ, लष्कर, चलन अगदी काहीच नाही, तरीही 'हा' देश श्रीमंतांच्या यादीत कसा? 

लघुग्रह आदळल्यानंतर त्याचे परिणाम कसे असतील? 

कॅनडातील वेस्टर्न ओंटारिओ आणि एथाबास्का युनिवर्सिटीतील शास्त्रज्ञांच्या अध्ययनानु सार हा लघुग्रह चंद्रावर धडकल्यास मोठ्या प्रमाणात मातीचा ढिग अवकाळात इतरत्र पसरू शकतो. ज्यामुळं 10 हजारहून अधिक सक्रिय उपग्रह आणि 25000 हून अधिक Space Object साठी ही धोक्याची बाब ठरु शकते. थोडक्यात सॅटेलाईटची प्रणाली, नेव्हिगेशन, डेटा ट्रान्समिशन अशा गोष्टी या घटनेमुळं प्रभावित होऊ शकतात. 

पृथ्वीवर या धडकेमुळं थेट परिणाम दिसणार नसले तरीही ही धडक इकती मोठ्या स्वरुपातील असेल जिथं चंद्रीय कण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून उल्कावर्षावास्वरुप स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Read More