Marathi News> विश्व
Advertisement

सॅटेलाईट्सची स्मशानभूमी म्हणून ओळखला जातो जगाचा 'हा' कोपरा, येतात भयानक आवाज; ट्रेनने फक्त 6 तासांत गाठू शकता स्पेस

Nemo Point: भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी जगातील सर्वात दुर्गम ठिकाण असलेल्या निमो पॉइंटवर ध्वज फडकवून एक नवा विक्रम रचला आहे. निमो पॉइंट हा पृथ्वीचा तो दुर्गम कोपरा आहे जिथून अवकाश फक्त 400 किलोमीटर अंतरावर आहे.  

सॅटेलाईट्सची स्मशानभूमी म्हणून ओळखला जातो जगाचा 'हा' कोपरा, येतात भयानक आवाज; ट्रेनने फक्त 6 तासांत गाठू शकता स्पेस

Satellite Graveyard: जगात अशी अनेक दुर्गम ठिकाणं आहेत, जिथे आजही माणूस पोहोचू शकलेला नाही. तिथे पोहोचणं शक्य असलं तरी हे धाडस प्रत्येकजण करतोच असं नाही. निमो पॉइंट ही अशीच एक जागा आहे. दक्षिण पॅसिफिकमध्ये स्थित पॉइंट निमो पार करणे खूप कठीण मानलं जाते. तसंच, येथील भयानक वातावरण माणसांसाठी अनुकूल आहे असं म्हणू शकत नाही. 2 ऑक्टोबर 2024 रोजी, जग प्रदक्षिणा घालण्याच्या मोहिमेवर निघालेल्या भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी, लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए नेमो पॉइंटवर पोहोचल्या आणि तिथे भारतीय ध्वज फडकवला. यानिमित्ताने निमो पॉइंट म्हणजे काय आणि ते का खास आहे हे जाणून घ्या?

पृथ्वीचा सर्वात दुर्गम कोपरा

निमो पॉइंट हा पृथ्वीवरील समुद्रात स्थित सर्वात दुर्गम आणि निर्जन भाग आहे, जिथून जवळचा भूभाग देखील सुमारे 2700 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे पृथ्वीचा शेवटचा कोपराच आहे असं म्हणू शकता. येथून अवकाश फक्त 400  किलोमीटर अंतरावर आहे यावरून त्याच्या अंतराचा अंदाज लावता येतो.

सर्वात जवळचा शेजारी पृथ्वी नाही तर अवकाश

जेव्हा तुम्ही निमो पॉइंटवर उभे राहता तेव्हा तुमच्या जवळची गोष्ट पृथ्वीवर नसून अवकाशात असेल. कारण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक येथून फक्त 400 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे उपस्थित असलेले अंतराळवीर तुमचे जवळचे शेजारी असतील. थोडक्यात सांगायचं झालं तर, जर एखादी ट्रेन निमो पॉइंटवरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत गेली तर तिथे पोहोचण्यासाठी 5 ते 6 तास लागतील.

सॅटलाईट्सची स्मशानभूमी

अंतराळापासून एकदम जवळ असल्याने आणि निर्जन भाग असल्याने येथे निष्क्रीय झालेले सॅटेलाईट्स पाडले जातात. यामुळेच या भागाला सॅटेलाईट्सची स्मशानभूमी म्हटलं जातं. निमो पॉइंटवर समुद्रात 200 पेक्षा जास्त सॅटेलाईट्स दफन आहेत. इथे भयाण शांतता असते आणि दुसरीकडे अजब, भीतिदायक आवाज ऐकू येत असतात. त्यामुळे येथे भूताटकी असल्याचं वाटतं. 

मोठ्या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी हे रहस्य उलगडलं आहे. मोठ्या बर्फाळ खडकांच्या तुटण्यामुळे हे आवाज निर्माण होतात. बर्फ फुटल्यावर निर्माण होणारी फ्रिक्वेन्सी हा आवाज तयार करते आणि खोल शांततेत एक भयानक भावना देते. शास्त्रज्ञ क्वचितच निमो पॉइंटवर संशोधनासाठी येतात.

About the Author

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहे. 2009 मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आपल्या करिअरला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत मीडियामध्ये 16 वर्षांचा अनुभव घेतला आहे. फोटोकॉर्... Read more

Read More