Marathi News> विश्व
Advertisement

New York Firing : न्यूयॉर्कच्या सबवे स्टेशनवर गोळीबार, अनेक जण जखमी

सबवे स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार झाल्यानंतर अलर्ट

New York Firing : न्यूयॉर्कच्या सबवे स्टेशनवर गोळीबार, अनेक जण जखमी

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात प्रचंड गोळीबारानंतर तणावाचे वातावरण आहे. येथे एका सबवे स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार झाल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. यासोबतच मेट्रो स्टेशनमधून अनेक बॉम्बही जप्त करण्यात आले आहेत.

Read More