Norway Jackpot: जगभरात सध्या सोनं, चांदी, प्लॅटीनम यासह एनेक मौल्यवान धातूंचा शोध घेत आहेत. अशातच एका युरोपियन देशात पृथ्वीला विनाशापासून वाचवणारा धातू सापडला आहे. 1016749200000000 रुपयांचा हा खजिना आहे. पुढची 50 वर्ष पुरेल इतका हा साठा आहे.
युरोपियन देश नॉर्वेला 1016749200000000 रुपयांचा जॅकपॉट लागला आहे. हा जॅकपॉट म्हणजे फॉस्फेट साठा आहे. दक्षिण नॉर्वेमध्ये 'जगातील सर्वात मोठा फॉस्फेट साठा' सापडला आहे. भविष्यात याचा वापर हरित तंत्रज्ञानात केला जाणार आहे.
नॉर्वेत सापडलेल्या या साठ्यात 70 अब्ज टन फॉस्फेट आहे. फॉस्फेटच्या या मोठ्या साठ्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी, सौर पॅनेल, खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या आयनच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता भासणार नाही. फॉस्फेटचा हा सर्वात मोठा साठा या वर्षाच्या सुरुवातीला नोर्ज मायनिंग नावाच्या कंपनीने शोधला होता. नैसर्गिक संसाधनांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या युरोपसाठी फॉस्फेटचा हा शोध गेम चेंजर ठरणार आहे.
युरोन्यूजच्या अहवालानुसार, नॉर्वेच्या नैऋत्य भागात आढळणारा हा फॉस्फेट साठा 2018 मध्ये सापडला होता. येथे 70 अब्ज टन फॉस्फेट आहे. हा साठा म्हणजे नॉर्वेला लागलेला जॅकपॉट आहे. यामुळे किमान 50 वर्षांपर्यंत त्याच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता भासणार नाही.
यामुळे हरित तंत्रज्ञानाच्या उत्पादनाला मोठी चालना मिळेल. अनेक उपकरणांमध्ये फॉस्फेटची प्रमुख भूमिका असते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच्या उत्पादनापासून ते सौर पॅनेल आणि वनस्पतींसाठी खतांपर्यंत, अनेक महत्त्वाच्या कामांसाठी फॉस्फेटचा वापर केला जातो.
जग आता शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करत आहे. या साठ्याच्या शोधामुळे छोटासा नॉर्वे देश आता चीन, मोरोक्को आणि रशियासारख्या देशांशी स्पर्धा करणार आहे. आतापर्यंत युरोप फॉस्फेटच्या पुरवठ्यासाठी या देशांवर अवलंबून होता. या नवीन ठेवीच्या प्राप्तीसह, युरोपचे इतर पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी होईल.