Baba Vanga Predictions: बाबा वेंगाने मृत्यूपूर्वी अनेक भाकिते केली होती, तसंच फ्रेंचमधील भविष्यकार नोस्ट्रेडेमस यांनीही 16 व्या शतकात अनेक भाकिते केली होती, जी नंतर खरी ठरली. नेपोलियन बोनापार्टच्या सत्तेच्या उदयाची आणि पहिल्या महायुद्धाची अचूक भविष्यवाणी करण्याचे श्रेय नास्त्रेदमस यांना जातं, तर 9/11 आणि राजकुमारी डायनाच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी करण्याचं श्रेय बाबा वेंगा यांना जातं. बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांच्या भाकितांपैकी एक खरी ठरू शकते. या भाकिताचा ब्रिटनवर परिणाम होणार आहे.
500 वर्षांपूर्वी, नास्त्रेदमस यांनी इंग्लंडला क्रूर युद्धांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे आत आणि बाहेरून शत्रू निर्माण होतील असं भविष्य वर्तवलं होतं. भूतकाळातील एक मोठी महामारी पुन्हा जगाचा विनाश करेल, आकाशाखाली यापेक्षा धोकादायक शत्रू नसेल असंही त्यांनी म्हटलं होतं.
500 वर्षांपूर्वी नास्त्रेदमस यांनी भाकीत केले होते की पाश्चात्य देशांचा प्रभाव कमी होईल. कारण जागतिक स्तरावर नवीन शक्ती उदयास येतील.
बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये भूकंपामुळे पृथ्वीवर विनाशाचे दृश्य दिसेल, तर युरोपला मोठ्या युद्धाला सामोरे जावे लागेल असं भाकीत वर्तवलं होतं. बाबा वेंगा यांनी दावा केला होता की, रशिया युद्धांमध्ये एक मजबूत शक्ती म्हणून उदयास येईल आणि जागतिक स्तरावरही त्याचे वर्चस्व प्रस्थापित करेल. अशा परिस्थितीत, रशिया आणि युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल बाबा वेंगा यांची भाकीत अचूक असल्याचं दिसत आहे.
नास्त्रेदमस यांनी 2024 पर्यंत युक्रेनसारखे युद्ध होण्याचीही भाकीत केलं होतं. परंतु ते पुढील वर्षी संपेल. त्यांनी लिहिलं होतं की, दीर्घ युद्धामुळे सैन्य थकले होते, ज्यामुळे सैनिकांसाठी पैसे नव्हते, सोने किंवा चांदीऐवजी त्यांनी चामडे, पितळ आणि इतर धातूंपासून नाणी बनवण्यास सुरुवात केली.
नास्त्रेदमस यांनी असाही दावा केला होता की, 2025 पर्यंत इंग्लंड आणि युरोपीय देशांमधील तणावपूर्ण संघर्षामुळे हा देश नष्ट होईल. 2025 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातही प्रगती होईल. यासोबतच, अवकाशातून येणारा एक गोळा आपल्या ग्रहावर आदळेल.
बाबा वांगा आणि नास्त्रेदमस यांनी २०२५ मध्ये मोठ्या महायुद्धाचीही भविष्यवाणी केली आहे, ज्यामध्ये पृथ्वीवर आगीचे गोळे पडण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.
बाबा वांगा यांनी त्यांच्या हयातीत अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर भूकंपाची भाकीत केली होती, जी नंतर खरी ठरली. यासोबतच त्यांनी वैद्यकशास्त्रातील प्रगतीचीही भाकीत केली होती.