Marathi News> विश्व
Advertisement

नास्त्रेदमसने 525 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली! जे भाकित केले होते अगदी तसचं 2025 मध्ये घडतंय?


नास्त्रेदमसने 525 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. नास्त्रेदमसने जे भाकित केले होते अगदी तसचं 2025 मध्ये घडताना दिसत आहे. 

नास्त्रेदमसने 525 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली! जे भाकित केले होते अगदी तसचं 2025 मध्ये घडतंय?

Nostradamus Predictions For 2025: फ्रेंचचे महान भविष्यकार नास्त्रेदमस यांनी 525 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यांनी जे भाकित केले होते अगदी तसचं 2025 मध्ये घडल्याचे दिसत आहे. 2025 हे वर्ष संपूर्ण जगासाठी अनेक संकट घेऊन आले  आहे. भूकंपासारख्या महाविनाशकारी घटना, अनेक देशांमध्ये निर्माण झालेली युद्धस्थिती,  व्यापार युद्ध यामुळे बाजारात मंदीचे सावट पहायला मिळत आहे. त्यातच ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे संपूर्ण जगावर आर्थिक भार पडला आहे. आणखी कोणत्या संकटांची भविष्यवाणी   नास्त्रेदमस यांनी केली आहे जाणून घेऊया.

नास्त्रेदमसची भविष्यवाणी आतापर्यंत 70 टक्के खरी ठरलीय. नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीवर सारं जग विश्वास ठेवतं. कारण त्यानं वर्तवलेली बरीचशी भाकितं खरी ठरली आहेत. नास्त्रेदमसने त्याच्या पुस्तकात एकूण 6 हजार 338 भाकितं वर्तवली आहेत. नास्त्रेदमसने 2025 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी महाभयानक आहे. 

नास्त्रेदमसने 15 व्या शतकात लिहिलेल्या रहस्यमय चार ओळींच्या कविता (quatrains) सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण, या चार ओळींमध्येच  नास्त्रेदमसने 2025 या वर्षाची भाकिते वर्तवली आहेत. कवितेत मनूद असलेल्या  'coin leather' याचा अर्थ आहे जगावर येणारे मोठं आर्थिक संकट. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला हादरा बसला आहे. शेअर मार्केट, सराफा बाजारा याचा फटका बसला आहे.  ब्राझीलमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होईल. तसेच विनाशकारी पूराचे भाकीत नास्त्रेदमसने वर्तवले आहे.  

नास्त्रेदमसने 2025 वर्षासाठी काही सकारात्मक भविष्यवाण्या देखील केल्या आहेत.  सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपेल, कारण दोन्ही सैन्य थकेल अशी भविष्यवाणी नास्त्रेदमसने केली आहे.  अंतराळात नविन ग्रहांचा शोध लागेल. मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या प्रयोगाला मोठे यश मिळेल. औषध आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती होईल असेही नास्त्रेदमसचे भाकित आहे. 

हे देखील वाचा.... भविष्यवाणी; भारतासाठी धोक्याचा इशारा! जुलै महिन्यात...

Read More