Marathi News> विश्व
Advertisement

इम्रान खान यांच्या पत्नीचा खळबळजनक गौप्यस्फोट

या पुस्तकाचा पाकिस्तानमधल्या निवडणुकीशी काहीच संबंध नसल्याचा दावा रहेम खान यांनी केलाय. 'झी मीडिया'ला स्काईपवरून दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. 

इम्रान खान यांच्या पत्नीचा खळबळजनक गौप्यस्फोट

लाहोर: एकीकडे पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांची धूम सुरू असतानाच तहरिक ए इन्साफ या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार इम्रान खान अडचणीत आले आहेत. माजी क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खान यांच्या पत्नीच्या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशित झाले. या आत्मचरित्रात रहेम खान यांनी खासगी आयुष्याविषयी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. इम्रान खान यांचे विवाहबाह्य अनैतिक संबंध, शारीरिक सुखाच्या बदल्यात महिलांना पक्षात दिली जाणारी पदं, इम्रान खान यांच्या अनौरस संतती, त्यांचं ड्रग्जचं व्यसन याबाबतीत अनेक स्फोटक खुलासे करण्यात आलेत.

मात्र, या पुस्तकाचा पाकिस्तानमधल्या निवडणुकीशी काहीच संबंध नसल्याचा दावा रहेम खान यांनी केलाय. 'झी मीडिया'ला स्काईपवरून दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. 

Read More