Marathi News> विश्व
Advertisement

Operation Sindoor: पाकचा माजी खेळाडूच्या गावावर एअर स्ट्राइक, लष्कराने हेच लोकेशन का निवडलं?

Operation Sindoor Location:  भारतीय सैनाने पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर मध्यरात्री साधारण दीडच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे  

Operation Sindoor: पाकचा माजी खेळाडूच्या गावावर एअर स्ट्राइक, लष्कराने हेच लोकेशन का निवडलं?

Operation Sindoor Location: मंगळवारी भारतीय लष्कराने आणि हवाई दलाने संयुक्तपणे कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करत दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्व्स्त केले  आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकचे मुळ गाव सियालकोटदेखील आहे. पण शोएब मलिकच्या मुळ गावी एअर स्ट्राइक का करण्यात आला? हे जाणून घेऊयात. 

भारतने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, पाकिस्तानसह पीओकेमध्ये एकूण 9 जागांवर एअरस्ट्राईक करण्यात आला. या कारवाईचे नाव ऑपरेशन सिंदूर देण्यात आले. हल्ला कुठे करायचा याचे लोकेशन आधीपासूनच ठरवण्यात आले होते. ही तिच ठिकाणं आहेत जिथे भारताविरोधातील दहशतवाद फोफावत होता. भारताकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले की, पाकिस्तानी सैन्याला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवण्यात आले नाही. पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांनाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. 

भारतीय लष्कराकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी कारवाई कशी करण्यात आली आणि तेच लोकेशन का निवडण्यात आले याबाबत ब्रीफ करण्यात आले. कर्नल सोफिया कुरैशी यांनी एअर स्ट्राइक करताना टार्गेटच्या लोकेशनबाबत सविस्तर सांगितले. त्यांनी म्हटलं की, पहिले लक्ष्य सियालकोटमधील सरजाल कँप होते. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किमी अंतरावर होते. मार्च 2025 मध्ये या कँपमध्ये प्रशिक्षित दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील 4 जवानांच्या हत्येसाठी कारणीभूत होते. दुसरा लक्ष्य सियालकोटमधील महमूदा कँप होता. जो आंतरराष्ट्रीय सीमेपासून 18 ते 12 किमी दूर होता. हा हिजबूल मुजाहिद्दीनचा मोठा कँप होता. कठुआ-जम्मू क्षेत्रात दहशतवाद पसरवण्यासाठी काम करत होता. 

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकचे मुळ गाव सियालकोट आहे. 1 फेब्रुवारी 1982 साली शोएबचा जन्म सियालकोटमध्ये पंजाबी राजपूत कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील फकीर हुसैन यांचे चपलांचे दुकान होते. 

Read More