Marathi News> विश्व
Advertisement

अरेच्चा! हे तर गरोदर संत्र, पाहणारेही चक्रावले....

सहसा संत्र सोलल्यानंतर त्यात आपल्याला लहानलहान फोडी दिसतात

अरेच्चा! हे तर गरोदर संत्र, पाहणारेही चक्रावले....

मुंबई : सध्याच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शत्य केल्या जात आहेत. अर्थात त्यामागे असणारी शास्त्रीय कारणंही समोर आली आहेत. पण, व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून चक्क संत्र गरोदर असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐकून विश्वास बसत नाहीये? हा व्हिडीओ एकदा पाहाच... 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक संत्र दिसत आहे, ज्याची साल काढली असता आतमध्ये दिसणारं दृश्य थक्क करत आहे. 

सहसा संत्र सोलल्यानंतर त्यात आपल्याला लहानलहान फोडी दिसतात. पण, इथे मात्र संत्र्याची साल काढल्यानंतर मात्र त्यामध्ये लहान लहान संत्री दिसत आहेत. 

एका इन्स्टाग्राम अकाऊंटरून हा संत्र्यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो पाहून अरेच्चा... हे असंही होतंय का ? हाच प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. 

लहान अकारापासून ते अगदी मोठ्या आकारापर्यंतची अनेक संत्री तुम्हीआम्ही खाल्ली असतील. पण, हे असं गरोदर संत्र कधी तुम्ही खाल्लं किंवा पाहिलं आहे का ? 

(वरील वृत्तामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)

Read More