Marathi News> विश्व
Advertisement

पंतप्रधान मोदींकडून सिंघापूर दौऱ्यात मशिदीला भेट

ऑर्किड गार्डन आणि सिंगापुरमधील सर्वात जुनं मरियामन मंदिर आणि भारताच्या ऐतिहासिक सेंटरलादेखील मोदी आज भेट देणार आहेत.

पंतप्रधान मोदींकडून सिंघापूर दौऱ्यात मशिदीला भेट

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंगापूर दौऱ्याचा आज (शनिवार, २ जून) अखेरचा दिवस आहे. सिंगापूरमधील क्लिफोर्ड पियर इथं पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरमधील मशिदीला भेट दिली आणि गांधी पट्टिकाचं अनावरण केलं. या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या काही अस्थींच विसर्जन करण्यात आलं आहे. यावेळी मोदींसमवेत सिंगापूरचे माजी पंतप्रधानदेखील उपस्थित होते.

दरम्यान, मोदी थोड्याच वेळात अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी भेट घेणार आहेत. आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑर्किड गार्डन आणि सिंगापुरमधील सर्वात जुनं मरियामन मंदिर आणि भारताच्या ऐतिहासिक सेंटरलादेखील मोदी आज भेट देणार आहेत.

Read More