Marathi News> विश्व
Advertisement

सनी लियोनीचा डायहार्ड फॅन होता ओसामा बिन लादेन, ठार मारल्यानंतर काय-काय सापडलं?

Osama Bin Laden was Fan of Sunny Leone and Alka Yagnik : ओसामा बिन लादेन हा सनी लियोनी आणि अलका यागिन्कचा मोठा चाहता होता.

सनी लियोनीचा डायहार्ड फॅन होता ओसामा बिन लादेन, ठार मारल्यानंतर काय-काय सापडलं?

Osama Bin Laden was Fan of Sunny Leone and Alka Yagnik : बॉलिवूडच्या सगळ्यात लोकप्रिय गायिका अलका याग्निक 1980-90 दशकातील स्टार आहेत. त्यांचा आज आवाजही अनेकांच्या आठवतात तर काही लोक अनेकदा गुणगुणताना दिसतात. त्यांनी खूप कमी वयात गाण गायला सुरुवात केली. तर त्यांना खरी ओळख ही माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या 'तेजाब' च्या गाण्यांनं मिळवून दिली. त्यावेळी देखील आणि आजही त्यांच्या या गाण्याचे आणि त्यांच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहितीये का की दहशतवादी ओसामा बिन लादेनच नाव देखील त्यांच्या चाहत्यांच्या यादीत होतं. इतकंच नाही तर ओसामा बिन लादेन हा अडल्ट स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीचा देखील चाहता होता. 

रिपोर्ट्सनुसार, ओसामा बिन लादेन सिंगर अलका याग्निक यांचा सगळ्यात मोठा चाहता होता. 2011 मध्ये CIA ने एबटाबादमधील ओसामाच्या घरावर छापा मारला तेव्हा त्याच्या कॉम्प्युटरमध्ये बॉलिवुडचे अनेक हिट गाणी सापडली होती. त्यात उदित नारायण, कुमार सानू आणि अलका याग्निक यांची गाणी होती.

जेव्हा अलका याग्निक यांना याविषयी सांगितलं की ओसामा बिन लादेनच्या कलेक्शनमध्ये त्यांची गाणी आहेत. तेव्हा अलका याग्निक यांना देखील आश्चर्य झालं. अलका याग्निक यांनी ही मुलाखत अनु रंजन यांना दिली होती. या मुलाखतीत त्यांची प्रतिक्रिया देत अलका याग्निक म्हणाल्या, 'जर ओसामा त्यांचा नंबर 1 चाहता आहे, तर त्यात त्यांची काय चूक आहे? पुढे याविषयी सांगत अलका याग्निक म्हणाल्या, ओसामा बिन लादेन जो कोणी असेल, त्याच्या मनात एक कलाकार तर असणारच. त्याला आवडत असेल, तर ते चांगलेच आहे.'

अलका याग्निक यांनी या मुलाखतीत पुढे हे देखील सांगितलं की, 'राजकारणामुळे त्यांना अनेक गाणी गाण्याची संधी गमवावी लागली होती. त्या म्हणाल्या की, त्यांचे सहकारी गायकांनी राजकारणाचं वापर करून त्यांना मिळालेली गाणी स्वत: साठी घेतली किंवा नंतर कळायचं की ते गाणं आता मी गात नसून दुसरी कोणती व्यक्ती गात आहे.'

सनी लियोनीचा चाहता

याशिवाय ओसामा बिन लादेनच्या कॉम्प्युटरमध्ये आणखी काही मिळालं असेल तर ते आहे. पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनचे व्हिडीओ. सनी लियोनच्या डॉक्युमेन्ट्रीमध्ये हा खुलासा करण्यात आला होता की ओसामा बिन लादेन हा तिचा चाहता होता. तिच्या अनेक व्हिडीओ सीडिज त्याच्याकडे असल्याची बाचमी समोर आली होती.

हेही वाचा : तेलुगू अभिनेत्याच्या घरी चोरी, हिऱ्याचे दागिने आणि लाखोंची रोकड... CCTV मध्ये कैद दृष्य

ओसामा बिन लादेनच्या कलेक्शनमध्ये 'अजनबी मुझको इतना बता', 'दिल तेरा आशिक' ही गाणी होती आणि त्याशिवाय 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाने तमन्ना' या चित्रपटातील उदित नारायण यांचं 'तू चांद है पूनम का' हे गाणं देखील होतं. 

Read More