Marathi News> विश्व
Advertisement

चक्क जेसीबीवरुन वरात, नववधु-वराला पाहून लोक झाले अचंबित पाहा Viral Video

लग्नात काहीतरी नवीन करण्याची क्रेझ आजकाल सर्वत्र पाहायला मिळते.

चक्क जेसीबीवरुन वरात, नववधु-वराला पाहून लोक झाले अचंबित पाहा Viral Video

इस्लामाबाद :  लग्नात काहीतरी नवीन करण्याची क्रेझ आजकाल सर्वत्र पाहायला मिळते. अगदी पाकिस्तानसुद्धा यासाठी मागे राहिलेला नाही. एका पाकिस्तानी जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने केली. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

पाकिस्तानच्या हुंझा व्हॅलीचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये, एक जोडपे लग्नाच्या विधीसाठी पूर्णपणे तयार दिसतात. विशेष बाब म्हणजे दोघांची वरात आलिशान वाहन किंवा पारंपारिक पद्धतीने नसून जेसीबीवरून काढण्यात आली. 

व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी जेसीबीच्या पुढे उभे आहेत आणि रस्त्याच्या कडेला असलेले लोक त्यांना उत्सुकतेने पाहत आहेत.  या खास वरातीसाठी  संपूर्ण वरात फुलांनी सजवली होती. थोड्या अंतरावर गेल्यानंतर नवरदेव आणि नवरी खाली उतरतात आणि पाहुणे जोरदार आतिशबाजी करतात. 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एवढंच नाही या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेन्टचा पाऊस पडत आहे. 

Read More