Viral Crime News : जग इतकं पुढे आलं असलं तरीही अनेकांची मानसिकता आणि अद्यापही काही तत्त्वांवर मात्र जग अद्यापही कुठेतरी अडकून पडल्याची अनुभूती काही मन सुन्न करणाऱ्या प्रसंगांतून पाहायला मिळते. तसाच एक प्रसंग नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकांच्याच पायाखालची जमिन सरकली
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये काही माणसं, भर रस्त्यामध्ये असणाऱ्या दोन गाड्या, एक तरुणी आणि तिच्यावर बंदुक रोखलेला एक माणूस पाहायला मिळत आहे. व्हिडीओत सुरू असणारा आरडाओरडा आणि त्यानंतर तिन-चार गोळ्यांचे आवाज अन् पुढच्याच क्षणाला कोसळलेली ती युवती. ही सारी दृश्य मन विचवित करत असून, माणूस म्हणून खूप काही चुकतंय हीच निराशेची भावना मनात घर करून जाते.
प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडीओ पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील असून, तिथं एका नवविवाहित दाम्पत्याला प्रेमविवाह केल्याप्रकरणी गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनास्थळावर अनेकजण त्या क्षणी उपस्थित असून त्यापैकी काहींनी या प्रसंगाचं चित्रीकरण करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यानंतर पाकिस्तानाच संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर 11 जणांना ताब्यात घेतलं असून, 9 आरोपींचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
बलुचिस्तानच्या डिघरी इथं ही घटना घडली. जिथं, काही लोक पिकअप ट्रकनं डोंगराळ भागात येतना दिसले. तिथं त्यांना एका युवतीनं आपण कायदेशीररिच्या विवाहित असल्याचं सांगितलं. 'या माझ्यासोबत सात पावलं चाला आणि मला गोळी मारा' असं तिनं त्यांना स्थानिक भाषेत म्हटल्याचं सांगण्यात येत आहे पण, याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती होऊ शकलेली नाही.
बंदुकधारी इसमानं तिच्यावर तीन गोळ्या झाडल्यानंतर ती तिथंच निपचित पडली आणि बंदुकधारी माणसानं लगेचच तिथं असणाऱ्या तिच्या पतिवरही गोळ्या झाडल्या. माध्यमांमध्ये उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार मृत तरुणीचं नाव बानो बीबी आणि तिच्या पतीचं नाव अहसान उल्लाह असून त्यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन निकाह केल्यानं या शिक्षेला त्यांना सामोरं जावं लागल्याचं म्हटलं गेलं.
The #JIRGA ordered their murder. Jirga members of today are not poor villagers--they are well-connected powerbrokers, cruising in oversized jeeps, flaunting guns as badges of honour! Go after them like they went after Bano & Ahsanullah! Show their faces to the world. Focus on… pic.twitter.com/DD2eUKIVKG
— Samar MinAllah Khan (@SamarMinallahKh) July 21, 2025
कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं या हत्येची माहिती पोलिसांना दिली नाही. मात्र स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार ही हत्या कबीलाई नेता सरदार सतकजईच्या आदेशावरून करण्यात आली. कुटुंबाविरोधात लग्न केल्यानं मुलीच्या भावाच्या तक्रारीनंतर त्यानं हा आदेश दिला होता.