Marathi News> विश्व
Advertisement

टोळधाडींशी लढण्यासाठी पाकिस्तान लढवतंय 'ही' शक्कल

असं केलं तर.....   

टोळधाडींशी लढण्यासाठी पाकिस्तान लढवतंय 'ही' शक्कल

इस्लामाबाद : काही दिवसांपासून टोळधाडींनी अनेक ठिकाणांवर अडचणीची परिस्थिती निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी शेजारी राष्ट्र पाकिस्तानीही यातून वाचलेलं नाही. याच टोळधाडींच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक पर्याय सुचवल्याचं म्हटलं जात आहे. 

मंगळवारी इम्रान खान यांनी अशाच एका कल्पनेला दुजोरा दिला. टोळधाडींना पकडून  ते कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांना विकणाऱ्यांना शासनाकडून आर्थिक स्वरुपात प्रोत्साहन देण्यात यावं. जेणेकरुन कुक्कुटपालन प्रकल्पातील कोंबड्यांना खाद्य म्हणून या टोळधाडींचा वापर होईल या कल्पनेशी ते सहमत दिसले. 

किंबहुना खान यांनी कॅबिनेट बैठकीत याबाबता प्रस्तावही मांडल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीनं 'डॉन'ला यासंदर्भातील माहिती दिली. शिवाय येत्या काळात देशात ही संकल्पना अंमलात आणण्याचा सूर त्यांनी आळवला. 

संकटाच्या या वेळीसुद्धा पंतप्रधान इम्रान खान यांना प्रसंगाकडे एका संधीच्याच स्वरुपात पाहून त्याचा फायदा करुन घ्यायचा होता. त्यामुळंच त्यांनी टोळधाडी पकडून त्यांची विक्री करण्याच्या कल्पनेला सहमती दिली, अशी माहिती पाकिस्तानचे मंत्री शिबील फराज यांनी दिली. 

 

वाचा  : नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात टोळधाडीचं आक्रमण

 

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृष्टी संघटनेकडून दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला टोळधाडीचा मोठा फटका बसू शकतो. ज्यामध्ये देशाचं तब्बल US$5 billion इतकं नुकसान होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ज्याचा पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळं पाकिस्तानपुढं आणखी एक मोठं संकटच उभं ठाकलं असल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

Read More