Marathi News> विश्व
Advertisement

सार्वजनिक ठिकाणी महिलेचे कपडे काढणाऱ्या 'नराधमांना' पाकिस्तानची साथ; शिक्षेसंदर्भातील धक्कादायक निर्णय

पाकिस्तान कायम त्याचा कुरापतीमुळे चर्चेत असतो. आता तर महिलांवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना पाकिस्तानने त्यांच्या एका निर्णयाने साथ दिल्याच चर्चा आहे.   

सार्वजनिक ठिकाणी महिलेचे कपडे काढणाऱ्या 'नराधमांना' पाकिस्तानची साथ; शिक्षेसंदर्भातील धक्कादायक निर्णय

आपला शेजारी देश आणि कट्टर शत्रू मानल्या जाणारा पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाकिस्तानने एका अशा विधेयकाला मंजूर दिली त्यानंतर ते महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे, असं दिसून येत आहे. महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्यात आली आहे. हो, अगदी पाकिस्तानच्या सिनेटने एक नवीन विधेयक मंजूर केलंय. ज्याअंतर्गत आता जर कोणी एखाद्या महिलेचे अपहरण केलं.  तसंच नंतर सार्वजनिक ठिकाणी तिचे कपडे काढले, या नराधमांची शिक्षा कमी करण्यात आली आहे.

यानंतर नराधमांना काय शिक्षा?

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सिनेटने कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक मोठ्या बहुमताने मंजूर केलंय. आता कायद्यानुसार, जर कोणी एखाद्या महिलेवर हल्ला केला किंवा सार्वजनिक ठिकाणी तिचे कपडे काढून तिचा अनादर केला तर पोलीस त्याला वॉरंटशिवाय अटक करू शकतील. हा गुन्हा अजामीनपात्र आणि असहमतीयोग्य मानला जाईल. गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा, दंड आणि मालमत्ता जप्तीची शिक्षा होईल.

पण काही सिनेटरनी याला तीव्र विरोध केला. या विधेयकावरील चर्चेदरम्यान खासदार अली जफर म्हणाले की, महिलांचे कपडे काढणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवावी. याशिवाय खासदार समीना मुमताज म्हणाल्या, 'आपण महिलांना कमकुवत बनवत आहोत आणि शिक्षेतील ही कपात परदेशातील लोकांना खूश करण्यासाठी केली जात आहे.'

कायदामंत्र्यांनी दिला एक अद्भुत युक्तिवाद 

कायदा मंत्री सिनेटर आझम नझीर तरार म्हणाले, 'कठोर शिक्षांमुळे गुन्हे थांबतात असे का मानलं जातं? आपल्या देशात 100 गुन्ह्यांसाठी मृत्युदंड आहे, तरीही गुन्हे कमी होत नाहीत. युरोपमध्ये मृत्युदंड नाही आणि तिथेही गुन्हे कमी आहेत. तर कधीकधी किरकोळ भांडणात महिलेचे कपडे फाडण्याचा खोटा खटला दाखल करून दुसऱ्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जातो. इस्लाम (शरिया) नुसार, फक्त 4 विशिष्ट गुन्ह्यांसाठी मृत्युदंड असावा. अशी अद्भुत युक्तिवाद कायदामंत्र्यांनी संसेद दिलं. 

Read More