Marathi News> विश्व
Advertisement

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा पुन्हा चर्चेत आली आहे. 

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हत्येची धमकी दिल्यानंतर चर्चेत आलेली पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा पुन्हा चर्चेत आली आहे. समाज माध्यमांमध्ये तिचा न्यूड व्हिडीओ व्हायरल होत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला होता. पाकिस्तानच्या कुरघोडी अधिकच सुरु झाल्या. दरम्यान पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा हिने देखील पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती.

पंतप्रधान मोदी हे हिटलरप्रमाणे आहेत. ते हुकुमशहा असल्याने त्यांना संपवण्याची इच्छा रबी पिरजादाने व्यक्त केली होती. त्यानंतर ही परिजादा नक्की कोण आहे ? याचे गुगल सर्च सुरु झाले. पण ती अनेक घटनांवर अशाप्रकारे उथळ प्रतिक्रिया देत असल्याचे समोर आले. दरम्यान आता न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती आता पुन्हा चर्चेत आली आहे.

पाकिस्तान लष्कर प्रवक्त्यांशी तिचे भांडण झाले होते. त्यावरूनच हा व्हिडीओ व्हायरल झाला अशी चर्चा आहे. यावर रबी पिरजादा हिने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. 

Read More