Marathi News> विश्व
Advertisement

Trending news: 5 वर्षाचा मुलाला गंभीर आजार असल्याचं पालकं वाटलं पण निघालं काहीतरी भलतंच...

World News: हल्ली अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना दिसत आहेत. त्यातून आता असाच एका भयंकर प्रकार इंग्लंडमध्ये (England) घडाला आहे. आधी त्याच्या पालकांना असं वाटलं की त्याला कुठलातरी गंभीर आजार झाला आहे परंतु त्याच्या पोटातून मॅगनेटिक टॉय्ज निघाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Trending news: 5 वर्षाचा मुलाला गंभीर आजार असल्याचं पालकं वाटलं पण निघालं काहीतरी भलतंच...

World News: हल्ली अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना दिसत आहेत. त्यातून आता असाच एका भयंकर प्रकार इंग्लंडमध्ये (England) घडाला आहे. आधी त्याच्या पालकांना असं वाटलं की त्याला कुठलातरी गंभीर आजार झाला आहे परंतु त्याच्या पोटातून मॅगनेटिक टॉय्ज निघाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलाला अचानक पोटदुखी सुरू झाली होती. त्यामुळे त्याला रूग्णालयात ठेवले परंतु अचानक त्याला जास्त त्रास होऊ लागल्यानं त्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर त्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर मात्र डॉक्टरांना आणि त्याच्या घरच्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. 

या मुलाचे आतड्याचे ऑपरेशन केले त्यातून त्याच्या पोटातून 50 पेक्षा जास्त टॉय मॅग्नेट बॉल काढले आहेत. यामुळे डॉक्टरांना तर आश्चर्याचा धक्का बसला आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, या मुलाचं नाव ज्यूड फॉली असून तो मेर्थिर टायडफिल, वेल्स, युके इथला आहे. फॉलीनं खेळताना 52 चुंबक बॉल गिळले होते. ऑगस्टमध्ये त्यांनी पोटदुखीची (Stomach Pain) तक्रार केली आणि त्यांना डॉक्टरांकडे एडमिट केले. परंतु त्याचा आजार तेव्हा गंभीर नसल्याचं डॉक्टरच्या लक्षात आलं परंतु त्यानंतर फॉलीच्या पोटाचा एक्स-रे काढला असता भलतेच सत्य समोर आले. पोटाच्या आतला गोलाकार आकार एक्स-रेमध्ये स्पष्टपणे दिसत होता. 

फॉलीचा एक्स-रे अहवालत असे दिसून आले की हा आकार चुंबकाच्या गोळ्यांचा आहे. जो त्याच्या आतड्यात अडकला होता. यानंतर 5 वर्षीय फॉलीला चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले जिथे ऑपरेशनद्वारे चुंबक गोळे बाहेर काढण्यात आले. फॉलीची आई लिंडसे म्हणाली, ऑपरेशन फार गुंतागुंतीचे होते. फोलीला हरवल्यासारखं वाटत होतं. मात्र त्याच दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली हे त्यांचे नशीब आहे. उशीर झाला असता तर जीवघेणे ठरू शकते. मुलाचे खेळणे इतके वाईट असेल अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. रिपोर्टनुसार, मुलांच्या रुग्णालयातील डॉक्टरांना फॉलीची आतडी पाच ठिकाणी कापावी लागली कारण त्यात चुंबकाचे गोळे अडकले होते.  

भारतातही घडला असाच एक प्रकार 

असाच एक धक्कादायक प्रकार हरियाणा येथे राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीसोबत घडला आहे. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाला म्हणून ही मुलगी डॉक्टरकडे गेली. सर्व वैदकीय तपासण्या केल्यानंतर या मुलीचा CT स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले. तिनं सेफ्टी पिन गिळली होती. श्वासाद्वारे ही पिन तिच्या फुफ्फुसात गेली होती. यामुळे मुलीला खोकल्याचा त्रास सुरु झाला. त्वरीत उपचार झाल्याने या मुलीचा जीव वाचला आहे. हरियाणातील(Haryana) रोहतग येथील  पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने ही मुलगी डॉक्टरांकडे गेली असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही पीन फुफ्फुसात खोलवर रूतली होती.  

 

 

Read More