Marathi News> विश्व
Advertisement

पोर्न स्टारचा डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबत नवा खुलासा

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या नव्या सेक्स स्कँडलबद्दलचा रिपोर्ट प्रकाशित झाला होता.

पोर्न स्टारचा डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबत नवा खुलासा

नवी दिल्ली : वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या नव्या सेक्स स्कँडलबद्दलचा रिपोर्ट प्रकाशित झाला होता.

रिपोर्टने अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप आणला आहे. या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रंप यांच्या वकिलाने 2016 मध्ये पोर्न स्टार डेनियल्सला 1 लाख 30 हजार डॉलर (जवळपास 75 लाख रुपये) दिले होते. ही रक्कम डेनियल्ससोबत ट्रंप यांच्या अनैतिक संबंधाबाबत खुलासा न करण्यासाठी देण्यात आली होती.

अमेरिकेतील टॅबलॉईड 'इन टच'ने 2011 मध्ये घेतलेल्या मुलाखतीत पॉर्न स्टार स्टेफनी क्लिफोर्डने या गोष्टीचा खुलासा केला होता की, तिचे ट्रंप यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. मेलानिया ट्रंप यांनी आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर 4 महिन्यांनी त्यांच्यामध्ये संबंध सुरु झाला.

क्लिफोर्डने इन टचसा दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 2006 मध्ये ट्रंप यांच्या लेक ताहोमध्ये तिने ट्रंप यांच्यासोबत संबंध बनवले. ट्रंप यांनी तिला आश्वासन दिलं होतं की ते तिला The Apprentice रिअॅलिटी शोमध्ये कास्ट करतील. क्लिफोर्डने सांगितलं की, ट्रंपने एकदा मला असं ही म्हटलं होतं की, मी त्यांच्या मुलीप्रमाणे स्मार्ट आणि सुंदर आहे. 

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, 'ही जुनी आणि पुन्हा बाहेर काढण्यात आलेली गोष्ट आहे. जी निवडणुकीच्या वेळी बाहेर निघाली होती. हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं आहे.'

Read More