Marathi News> विश्व
Advertisement

Trending Video : गरोदर संत्र कधी पाहिलं आहे का?

Orange Viral Video : ...पण हे संत्र पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Trending Video : गरोदर संत्र कधी पाहिलं आहे का?

Orange Video : सोशल मीडिया (Social Media) हा अनेक भन्नाट व्हिडीओचा खजिना आहे. आपल्या रोज इथे एकशे एक आपल्याला बुचकळ्यात पाडणारे व्हिडीओ (Video ) पाहिला मिळतात. निसर्गाचे चमत्काराचे दोन भन्नाट व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी आणले होते. काही दिवसांपूर्वी एका केळीच्या (Banana) बाजूला केळीसारखंच हुबेहुब दिसणारा साप असणारा व्हिडीओ आपण पाहिला. आता असाच एक संत्र्याचा व्हिडीओ (Orange Video)सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral) होतो आहे. 

नागपूर (Nagpur) हे संत्र्यांचं शहर (Orange City) म्हणून ओळखलं जातं. या शहरातील लोकांनीही असा संत्र्याचा व्हिडीओ नक्कीच बघितला नसेल. आता तुम्ही पण म्हणाल की, असं काय आहे या व्हिडीओमध्ये...तर आम्हाला पहिले सांगा संत्री सोलल्यावर तुम्हाला कधी धक्का बसला आहे का? पण हे संत्र पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

गरोदर संत्र...(Pregnant Orange)

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हे संत्र सोलल्यानंतर त्यात आणखी काही लहान लहान संत्री आहेत. हा व्हिडीओ बघून नेटकरी चाट पडले आहेत. या मोठ्या संत्र्यामध्ये जवळपास आत 7 ते 8 लहान लहान संत्री दिसतात. 

रायसिंग टेक (rising.tech) नावाच्या इंस्टाग्राम (instagram) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही नेटकरी म्हणत आहेत की हे संत्रे गरोदर आहे. 

Read More