Marathi News> विश्व
Advertisement

I Hate Indians म्हणत अमेरिकन महिलेची भारतीयांना शिवीगाळ करत मारहाण ; video viral

अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या महिलांवर एका अमेरिकन महिलेने  बंदुक दाखवत केली शिवीगाळ

I Hate Indians म्हणत अमेरिकन महिलेची भारतीयांना शिवीगाळ करत मारहाण ; video viral

प्लानो : (American Woman) अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांवर वांशिक हल्ल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका अमेरिकन महिलेनं 4 भारतीय महिलांना शिवीगाळ, मारहाण करत इतक्यावरच न थांबता त्यानंतर त्यांच्यावर बंदुक रोखत गोळ्या घालण्याची धमकीही दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

टेक्सासमधील (Texas) एका हॉटेलमध्ये 4 भारतीय महिला जेवणासाठी गेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर त्या पार्किंगच्या दिशेने जात असताना, त्यावेळी तिथं अमेरिकन महिला आली आणि तिनं त्या भारतीय महिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

'मी तुम्हा भारतीयांचा तिरस्कार करते. सर्व भारतीय चांगलं आयुष्य जगण्यासाठी अमेरिकेत येतात', असं अमेरिकन महिला भारतीय महिलांना हिणावताना दिसली.

भारतीय महिलांनी तिचा विरोध करण्यास सुरुवात केली तेव्हाच एस्मेराल्डा (परदेशी महिला) त्यांच्या अंगावर धावून येत त्यांना मारहाण करु लागली. एस्मेराल्डा त्यावेळी नशेमध्ये असल्याचं माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सदर घटनेसंदर्भात भारतीय महिलांनी पोलिसांना माहिती देताच एस्मेराल्डा अप्टनला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

 

एस्मेराल्डा अप्टनवर गंभीर कलमं लावण्यात आली आहेत. त्यासोबतच तिला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकन समुदायाने निषेध व्यक्त केला आहे.

 'हा एक भयानक अनुभव होता. या गुन्ह्यासाठी आरोपी महिलेला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आशियाई-अमेरिकन नेत्या रीमा रसूल यांनी ट्विट करत केली आहे.

Read More