Marathi News> विश्व
Advertisement

30 हजार फूट उंचीवर विमान ऑटो पायलट मोडमध्ये असताना पायलट आणि एअर होस्टेस... लांब पल्ल्याच्या फ्लाईटमध्ये नको नको ते घडतं

30 हजार फूट उंचीवर विमान ऑटो पायलट मोडमध्ये असताना नको नको ते प्रकार घडतात. पायलट आणि एअर होस्टेस एकत्र रोमान्स करतात.

 30 हजार फूट उंचीवर विमान ऑटो पायलट मोडमध्ये असताना पायलट आणि एअर होस्टेस... लांब पल्ल्याच्या फ्लाईटमध्ये नको नको ते घडतं

Reality Of Flight Crew Member And Pilot : सध्या चित्र विचित्र अपघातांमुळे विमान प्रवास चर्चेत आला आहे. विमानात येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांसह आता विमानात   पायलट आणि एअर होस्टेस यांच्यात काय काय घडते याचे देखील किस्सेस समोर आले आहेत.  30 हजार फूट उंचीवर विमान ऑटो पायलट मोडमध्ये असताना पायलट आणि एअर होस्टेस यांच्यात रोमान्स चालतो. एका एअर होस्टेसने पायलट आणि क्रू मेंबर्सच्या अशा कृत्यांचा खुलासा केला आहे. 

जेव्हा प्रवासी लांबच्या विमानांमध्ये आरामात प्रवास करत असतात तेव्हा कॉकपिटमध्ये एक वेगळेच प्रकार सुरु असतात. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, सिएरा मिस्ट नावाच्या एका एअर होस्टेसने सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये एक धक्कादायक दावा केला आहे. तिने म्हटले आहे की, जेव्हा प्रवासी लांबच्या विमानांमध्ये विश्रांती घेत असतात तेव्हा कॉकपिटमधील पायलट आणि एअर होस्टेस किंवा इतर केबिन क्रू माईल हाय क्लबमध्ये सामील होतात. 

माईल हाय क्लब म्हणजे जेव्हा फ्लाइट अटेंडंट, पायलट किंवा इतर केबिन क्रू फ्लाइट दरम्यान रोमान्स करतात. मिस्टने सांगितले की, काही तासांच्या प्रवासादरम्यान, जेव्हा विमान एका विशिष्ट उंचीवर राहते, तेव्हा पायलट विमानाला काही काळ ऑटो पायलट मोडमध्ये ठेवतात. त्यानंतर पायलट आणि फ्लाइट अटेंडंटचा रोमान्स सुरू होतो.   मिस्टच्या मते, कॉकपिटमध्ये नेहमीच दोन पायलट असतात. असेही घडते की जेव्हा एका पायलटला विश्रांती घ्यावी लागते तेव्हा दुसरा विमान चालवतो. विश्रांती घेणाऱ्या पायलटचे एअर होस्टेससोबत प्रेमसंबंध असतात किंवा जेव्हा एकमेकांना आवडणारे पायलट किंवा एअर होस्टेस एकाच फ्लाइटमध्ये एकत्र असतात तेव्हा ते सहजपणे एकमेकांशी रोमान्स करतात आणि नातेसंबंध देखील निर्माण करतात. 

मिस्टने म्हटले की जर पायलटला भूक लागली असेल किंवा त्याला टॉयलेटमध्ये जायचे असेल तर त्याला फ्लाइट डेकमधून बाहेर यावे लागते. ही अशी वेळ असते जेव्हा एक एअर होस्टेस कॉकपिटमध्ये जाते आणि नंतर पायलट विमान ऑटो पायलट मोडवर ठेवते आणि रोमान्स करते. 
विमानात हे सर्व करणे बेकायदेशीर नसले तरी ते योग्य म्हणता येणार नाही. त्यांनी सांगितले की, अनेक वेळा त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात बाथरूम आणि केबिनमध्ये असे कृत्य करताना पकडले आहे. विमानात सेक्स करताना पायलट आणि एअर होस्टेसना कडक नियम पाळावे लागतात. 

Read More