Marathi News> विश्व
Advertisement

ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या Rishi Sunak यांनी जपली भारतीय संस्कृती

त्यांचा एक व्हिडीओ ट्विटवर शेअर करण्यात आला आहे.

ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या Rishi Sunak यांनी जपली भारतीय संस्कृती

Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान (Britin Prime Minister) बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांच्या शर्यतीत आलेले नेते ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी भारतीय परंपरा जपत गाईची पुजा केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ ट्विटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात ते लंडनमध्ये गौ माता पूजा करताना दिसत आहेत. 

ते त्यांच्या पत्नीसह लंडनमधल्या गायींच्या गोठ्यात गेले होते. तिथे त्यांनी गायीची पुजा केली.  व्हिडीओत ऋषी सुनक हे गायीला पवित्र जल अर्पण करताना दिसत आहेत सोबतच त्यांनी पुजारींसमवेत गायीच्या पुजेसाठी विधीही संपन्न केल्या.

त्यांना गायीची आरतीही यावेळी केली. काही दिवसांपुर्वीच त्यांनी आपल्या पत्नीसोबत जन्माष्टमी साजरी केली होती त्यासाठी त्यांनी लंडनच्या भक्तिवेदांत मंदिराचे दर्शन घेतले. 

भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक हे पुढील ब्रिटिश पंतप्रधानाच्या यादीत आहेत. ऋषी सुनक यांचा जन्म 1980 साली हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये झाला. त्यांनी Oxford विद्यापीठातून तत्त्वज्ञान ,राजकारण, आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं आहे. तसेच स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक नोकरीही केली आहे. 

त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं. कोरोनाच्या काळात ऋषी सुनक यांनी उत्तम काम केले होते. ऋषी सुनक ब्रिटनचे अर्थमंत्री झाले. आता ते ब्रिटनच्या पंतप्रधानपदी येण्याची शक्यता आहे. 

Read More