Marathi News> विश्व
Advertisement

गुड न्यूज ! ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलने केलं बाळाचं स्वागत 

गुड न्यूज ! ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन

मुंबई : ब्रिटनच्या राजघराण्याकडून साऱ्या जगाला पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळाली आहे. या राजघराण्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं ज्याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या आयुष्यात एका गोंडस बाळाच्या येण्याने आनंदाला नवी पालवी फुटली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्कलला सोमवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

इन्स्टाग्रामवर असणाऱ्या ब्रिटनच्या राजघराण्याच्या अधिकृत अकाऊंटवरुन एक आकर्षक पोस्ट करत याविषयीची माहिती देण्यात आली. 'आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, द ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स यांनी ६ मे २०१९ रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं', असं लिहित बाळ आणि आई या दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती या पोस्टमधून देण्यात आली. 'It`s a boy', असं लिहिलेला फोटो पोस्ट करत मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या वतीने ही आनंदवार्ता साऱ्या विश्वापर्यंत पोहोचवण्यात आली. याच माध्यमातून त्या दोघांनीही तमाम हितचिंतकांचेही या प्रसंगात आणि अतिशय महत्त्वाच्या क्षणांत साथ दिल्याबद्दल मनापासून आभार मानले. 

ब्रिटीश राजघराण्याच्या वारसा हक्कामध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगनचा हा पहिला मुलगा सातव्या क्रमांकाचा दावेदार सांगण्यात येतो.  २०१८ मध्ये मेगन आणि प्रिन्स हॅरी विवाहबंधनात अडकले होते. शाही थाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याने साऱ्या जगाचं लक्ष वेधलं होतं. राजघराण्याशी संबंध जोडले गेल्यानंतर आणि त्यातही विवाहबंधनात अडकल्यानंतर मेगनने अभिनय विश्वातून काढता पाय घेतला होता. 

Read More