Marathi News> विश्व
Advertisement

रशियाची क्रूरता दाखवणारा थरारक व्हिडीओ, भरधाव रणगाड्यानं चिरडली कार

हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल! रशियाचा क्रूर चेहरा समोर....पाहा थरारक व्हिडीओ

रशियाची क्रूरता दाखवणारा थरारक व्हिडीओ, भरधाव रणगाड्यानं चिरडली कार

किव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने तिथल्या बऱ्याच शहरांमध्ये आपलं सैन्य पाठवलं आहे. युक्रेन अजूनही झुकला नाही. तेवढ्याच ताकदीनं रशियासोबत लढत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्यानं मोठं नुकसान केलं आहे. 

रशियाच्या रणगाड्याने क्रूरपणे एक गोष्ट केली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणगाड्याने अगदी क्रूरपणे कार चिडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रणगाड्याने कारला वाईट पद्धतीनं चिरडलं आहे. 

रशियन सैन्यांनी युक्रेनची राजधानी ताब्यात घेण्यास सुरवात केलीय. रशियन सैन्य किव्हच्या मध्यभागी दाखल झालं आहे. रशियन सैन्यानं युक्रेनमधल्या मोठ्या इमारतींना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे युक्रेनचं अतोनात नुकसान झालं आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधून रशिया किती क्रूरपणे वागत आहे ते दिसत आहे. हा अपघात होता की मुद्दाम करण्यात आलं होतं याची कोणतीही माहिती अजून समोर आली नाही. युक्रेनचं मोठ्या प्रमाणात या युद्धात नुकसान झालं आहे.

Read More