Marathi News> विश्व
Advertisement

जगण्या मरण्याचा संघर्ष सुरू असताना युक्रेनच्या सैनिकानं अशी दिली प्रेमाची कबुली

गर्लफ्रेंडसाठी युक्रेनच्या सैनिकानं जे केलं.... हा व्हिडीओ नेहमीच पाहिला जाईल

जगण्या मरण्याचा संघर्ष सुरू असताना युक्रेनच्या सैनिकानं अशी दिली प्रेमाची कबुली

कीव्ह : रशिया-युक्रेन यांच्या गेल्या काही दिवसांपासून युद्ध संघर्ष सुरू आहे. एकीकडे देशासाठी लढायचं आहे पण दुसरीकडे आपली कोणीतरी आतूरतेनं वाट पाहात आहे ही काळजी देखील डोक्यात आहे. लोक जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेत आहेत. या युद्ध संघर्षा दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भावुक देखील करणारा आहे. 

युक्रेनच्या चेकपॉईंटवर गुडघ्यावर बसून सैनिकानं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला हे पाहून हैराण होते. ती रिंग हातात घेते आणि त्याला मिठी मारते. अत्यंत भावुक क्षण हा तिथल्या सैनिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. 

कीव्हच्या चेकपॉईंटवरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची झडती घेतली जात होती. त्याचवेळी महिला जशी कारमधून बाहेर पडली तसं एक सैनिक गुडघ्यावर बसला. त्याने या महिलेला प्रपोज केलं. महिला हे सगळं पाहून थक्क होते. हे सगळं पाहून आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवायला लागतात. 

इतर सैनिक या दोघांचंही अभिनंदन करत आहेत. व्हिडीओमध्ये एक सैनिक गिटार वाजवत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

Read More