Marathi News> विश्व
Advertisement

'महिलांवर बलात्कार कर, फक्त प्रोटेक्शन वापर'; सैनिक नवऱ्याला पत्नीचा सल्ला! आता 5 वर्ष...

Russian Woman Jailed: या नवरा-बायकोमधील संवाद एका फोन कॉल ट्रॅकिंगदरम्यान समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

'महिलांवर बलात्कार कर, फक्त प्रोटेक्शन वापर'; सैनिक नवऱ्याला पत्नीचा सल्ला! आता 5 वर्ष...

Russian Woman Jailed: एका रशियन महिलेला तिच्या अगदीच विचित्र मागणीसाठी थेट तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या महिलेचा पती रशियन लष्करामध्ये सैनिक म्हणून कार्यरत आहे. सध्या सुरु असलेल्या रशिया विरुद्ध युक्रेन युद्धात या महिलेचा पती युद्धभूमीवर लढत आहे. युद्ध लढणाऱ्या आपल्या पतीला या महिलेने प्रोत्साहन देण्यासाठी एक विचित्र विधान केलं आणि त्यामुळेच ती तुरुंगात गेली आहे. युक्रेनमधील महिलांवर बलात्कार कर, असं या महिलेने आपल्या पतीला सांगितल्याचं वृत्त रशियामधील, 'प्रऊडा' नावाच्या वृत्तपत्राने म्हटलं आहे.

रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या युद्धात मोठ्याप्रमाणात प्राणहानी झाली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या हजारो मृत्यूंबरोबरच मोठ्याप्रमाणात मालमत्तेचं नुकसानही झालं आहे. या युद्धात अनेकदा मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याची टीका जगभरातून होत असतानाच या महिलेनं असं विधान केल्याने आगीत तेल ओतल्यासारखी स्थिती झाली असून तिने सर्वांचाचा रोष ओढावून घेतला आहे.

काय शिक्षा सुनावली?

रशियन वृत्तपत्राने 'रेडिओ लिबर्टी'च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या माहिलेचं नाव ओल्गा बायक्होस्काया असं आहे. ओल्गाने तिच्या पतीला युक्रेन युद्धादरम्यान तिथल्या महिलांवर बलात्कार कर अशी चिथावणी दिली होती. मात्र तिचं हे विधान युद्धासंदर्भातील नियम आणि कायदे मोडणारं असल्याचं कोर्टातील सुनावणीदरम्यान सिद्ध झालं आहे. या एका विधानमुळे आता ओल्गाला पाच वर्ष तुरुंगात काढावी लागणार आहेत. किव्हमधील जिल्हा कोर्टाने तिला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

नक्की ही महिला पतीला काय म्हणाली?

2022 साली एप्रिल महिन्यात सिक्युरिटी सर्व्हिस ऑफ युक्रेनने जारी केलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये आरोपी महिला म्हणजेच ओल्गा तिच्या पतीशी बोलत असल्याचं स्पष्ट होतं आहे. युद्धात युक्रेनने इंटरसेप्ट केलेल्या रशियन सैनिकांच्या कॉल्सदरम्यान हा कॉलही इंटरसेप्ट करण्यात आला. फोन कॉलवर ही महिला तिच्या पतीला युक्रेनमधील महिलांवर बलात्कार करण्याची परवानगी देत असल्याचं ऐकू येत आहे. जोपर्यंत पती प्रोटेक्शन वापरुन तिथल्या महिलांवर बलात्कार करतोय तोपर्यंत आपल्याला काहीच हरकत नाही, असं ही महिला फोन कॉलवर म्हणाल्याचं ऑडिओमधून स्पष्ट होतंय. 

पत्रकारांनी शोधले फोनवरील दोघे कोण

'रेडिओ लिबर्टी'च्या रशियन आणि युक्रेनमधील पत्रकरांनी या फोन कॉलवर बोलणाऱ्या दोन व्यक्ती म्हणजे ओल्गा आणि तिचा सैन्यात सेवा देणारा पती रोमान असल्याचं शोधून काढलं. हे दोघेही रशियाने ताबा मिळवलेल्या क्रिमियामध्ये वास्तव्यास असल्याचंही तपासात समोर आलं. युद्धासंदर्भातील नियम मोडल्याने ओल्गाविरुद्ध नोटीस जारी करुन तिला वॉण्टेड लिस्टमध्ये टाकण्यात आलं. या प्रकरणात युक्रेनमधील अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करुन आपला अहवाल डिसेंबर 2022 मध्ये कोर्टाकडे सोपवला होता.

Read More