Marathi News> विश्व
Advertisement

जपानी बाबा वेंगाची महाभविष्यवाणी 82 टक्के खरी ठरणार? महात्सुनामी येणार? एका पाठोपाठ एक भूकंपाचे हजारो धक्के

अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. जपानी बाबा वेंगाने 5 जुलै रोजी भयानक भविष्यवाणी केली आहे.   

 जपानी बाबा वेंगाची महाभविष्यवाणी  82 टक्के खरी ठरणार? महात्सुनामी येणार? एका पाठोपाठ एक भूकंपाचे हजारो धक्के

Ryo Tatsuki Japan Baba Vanga Predictions List 5 July Earthquake Tsunami : जपानमध्ये भूकंप होऊन महात्सुनामी येईल अशी भविष्यवाणी जपानी बाबा वेंगाने केली आहे.  जपानी बाबा वेंगाची महाभविष्यवाणी 82 टक्के खरी ठरणार अशी भिती व्यक केली जात आहे. कारण, जपानमध्ये एका पाठोपाठ एक भूकंपाचे हजारो धक्के बसले इतकचं नाही तर, समुद्रातून चित्र विचित्र आवाज येत आहेत. जपानमध्ये घडत असलेल्या या घटनामुंळे सर्वचजण भयभित झाले आहेत. 

जपानचे प्रसिद्ध कलाकार आणि भविष्यवेत्ता रियो तुतुस्की हे जपानी बाबा वेंगा म्हणून ओखळले जातात.  जुलै महिन्यात महाप्रलय येणार असल्याची भविष्यवाणी या जापानी बाबा वेंगाने केली आहे. 5 जुलै  2025 रोजी जपानमध्ये विनाशकारी आपत्ती येणार आहे.  भूकंपानंतर महाप्रलयकारी त्सुनामी येईल. यामुळ जपानमध्ये मोठा विध्वंस होईल. जपान मध्ये येणारी ही आपत्ती 2011 मध्ये आलेल्या आपत्तीपेक्षा डेंर असेल अशी रियो तुतुस्की यांची भविष्यवाणी आहे.  2011 मध्ये जपानमध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर जापमध्ये महाप्रलयकारी भूकंप आला होता. या त्सुनामीमध्ये हजारो लोकां मृत्यू झाला होता.  5 जुलै  2025 रोजी यापेक्षा आणखी काही तरी भयानक आपत्ती येऊ शकते अशी भविष्यवाणी या जपानी बाबा वेंगाने केली आहे. 

दरम्यान, जपानच्या दक्षिणेकडील दुर्गम भागातील टोकारा आयलंड मालिकेतील अकुसेकिजिमा बेटावर सातत्याने सतत भूकंपांचे हादरे बसत आहेत. यामुळे लोकांची झोप उडाली आहे.  21 जून 2025 पासून या बेटावर भूकंपाचे धक्के जाणवायला सुरूवात झाली आहे. जपान हवामान संस्थेने दिलेल्या माहिती या प्रदेशात 900 अधिक भूकंपांची नोंद झाली आहे. त्यापैकी 50 पेक्षा जास्त भूकंप बहुतेक लोकांना जाणवतील इतके तीव्र होते. भूकंपाच्या हादराऱ्यांसह समुद्र देखील खवळल्याचे स्थांनिकांनी सांगितले. समुद्रातून भयभित करणारे आवाज येत आहेत.  रियो तुतुस्की यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार 5 जुलै ला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यामुळे जपानी नागरिक प्रचंड भयभित झाले आहेत. 

रियो तुतुस्की यांनी केलेल्या कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत?

रियो तुतुस्की  यांनी 199 मध्ये त्यांच्या वाताशी गा मिता मिरा या पुस्तकात 5 जुलै 2025 मध्ये मोठ्या धोक्याची भविष्यवाणी केली आहे. राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरी यांचे निधन, 2011 चा भूकंप आणि कोविड-19 साथीचा रोग अशी अनेक भाकितं रियो तुतुस्की यांनी केली होती. या सर्व भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.

 

Read More