Marathi News> विश्व
Advertisement

अमेरिकेत शाळेत गोळीबार, १० जणांचा मृत्यू

 टेक्सास येथील एका शाळेमध्ये गोळीबार करण्यात आलाय. यात १० जणांचा मृत्यू.

अमेरिकेत शाळेत गोळीबार, १० जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेमधील टेक्सास येथील एका शाळेमध्ये गोळीबार करण्यात आलाय. यात १० जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी आहेत. पोलिसांनी शाळेच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्याचबरोबर मुलांना अन्य सुरक्षास्थळी हालवण्यात येणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.

शाळेवर का हल्ला करण्यात आला. याची माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक क्रिस रिचर्डसन यांनी दिली. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  या घटनेबाबत तीव्र दुखः व्यक्त केले आहे.

Read More