Marathi News> विश्व
Advertisement

Saudi Arabia Visa Ban: सौदी अरेबियाने भारतासह 14 देशांवर घातली व्हिसा बंदी, कारण...

Saudi Arabia Visa Ban: सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानसह एकूण 14 देशांना मोठा झटका देत व्हिसावर बंदी घातली आहे.   

Saudi Arabia Visa Ban: सौदी अरेबियाने भारतासह 14 देशांवर घातली व्हिसा बंदी, कारण...

Saudi Visa Ban: सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानसह एकूण 14 देशांना मोठा झटका दिला आहे. सौदी अरेबियाने व्हिसावर बंदी घातली आहे. पण हे लक्षात घ्या की ही बंदी सौदी अरेबिया सरकारनी ही तात्पुरती स्वरूपाची घातली आहे. ही बंदी बिझनेस आणि फॅमिली व्हिसासह उमराह व्हिसावरही लागू होईल. सौदी अरेबियाची व्हिसा बंदी जूनमध्ये हज यात्रा (Hajj Yatra 2025) संपेपर्यंत लागू राहील.

का घालण्यात आली बंदी? 

हज यात्रेमुळे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये हे निर्बंध लादण्यात आले आहेत. सौदी अरेबियाची व्हिसा बंदी ही भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांतील यात्रेकरूंसाठी निराशाजनक बाब आहे. कारण तिथे हजारो लोक हजसाठी जातात.

हा निर्णय का घेतला गेला?

सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, योग्य नोंदणीशिवाय लोकांना हज करण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. इतर देशांतील नागरिक उमराह व्हिसा किंवा व्हिजिट व्हिसा घेऊन सौदी अरेबियात येतात आणि पवित्र मक्कामध्ये हज करण्यासाठी बेकायदेशीरपणे तेथे राहतात, असा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे.

युवराजांनी हा आदेश दिला

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अधिकाऱ्यांना कठोर व्हिसा नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरून देशातील हज यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडू शकेल. अहवालानुसार, नवीन उपक्रमांतर्गत 13 एप्रिलपर्यंत परदेशातून येणाऱ्या लोकांना व्हिजिट व्हिसा किंवा उमराह व्हिसा जारी केला जाईल.

'या' देशांवर बंदी घालण्यात आली 

यानंतर यादीत समाविष्ट 14 देशांतील कोणत्याही व्यक्तीला नवीन व्हिसा जारी केला जाणार नाही. अहवालात 13 देशांची ओळख पटवली आहे ज्यांवर सौदी अरेबियाची व्हिसा बंदी लागू होईल. ज्या देशांमध्ये सौदी अरेबियाने व्हिसा बंदी घातली आहे त्याची यादी बघुयात... 

1. भारत

2. पाकिस्तान

3. बांगलादेश

4. इजिप्त

5. इंडोनेशिया

6. इराक

7. नायजेरिया

8. जॉर्डन

9. अल्जेरिया

10. सुदान

11. इथिओपिया

12. ट्युनिशिया

13. येमेन

का घेतला हा निर्णय?

2024 च्या हज यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या घटनेत 1,000 हून अधिक लोक मारले गेले होते. यातील अनेक यात्रेकरू अनधिकृत होते. प्रचंड गर्दी आणि प्रचंड उकाडा यामुळे हा अपघात झाला होता. 

Read More