School Teacher Sexual Relationship with Student: शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर शिक्षणासोबतच संस्कारही घडत असतात. येथे विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असते. पण येथेच मुलांसोबत गैरप्रकार झाला तर? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जेथे शालेय शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबतच लैगिक संबंध ठेवले. कुठे घडली ही घटना? हा प्रकार कसा उजेडात आला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मिशिगनमधील ओक्साइड प्रेप अकादमीच्या माजी शिक्षिका जोसेलिन सॅनरोमन यांच्यावर किशोरवयीन विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तिच्यावर गुन्हेगारी लैंगिक वर्तनाचा ठपका ठेवण्यात आलाय. ओकलंड काउंटी अभियोक्ता करेन डी. मॅकडोनाल्ड यांनी यासंदर्भात माहिती दिली. 2023 मध्ये सॅनरोमन यांनी 16 वर्षांच्या मुलाशी लैंगिक संबंध ठेवले आणि कथितपणे या प्रकाराबद्दल दुसऱ्या शिक्षिकेला सांगितले. मी विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवत आहे, असे ती दुसऱ्या शिक्षिकेला म्हणाली. सॅनरोमनने दुसऱ्या शिक्षिकेला तिच्या नात्याबद्दल सांगितले. त्यादृष्टीने तपास सुरू झाला. यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून पोलिसांना या घटनेबद्दल कळवण्यात आल्याचे मॅकडोनाल्ड यांनी सांगितले.
जोसेलिन सॅनरोमन याा शिक्षिकेवर अल्पवयीन मुलाचे शोषण करण्यासाठी तिच्या अधिकाराचा वापर केल्याचा आरोप असल्याचे ओकलंड काउंटी अभियोक्ता करेन मॅकडोनाल्ड यांनी सांगितले. मॅकडोनाल्ड यांनी पुढे येऊन घटनेचा खुलासा करणाऱ्या सहकाऱ्याचे कौतुक केले. या परिस्थितीबद्दल पोलिसांशी संपर्क साधणाऱ्या आणि इतर विद्यार्थ्यांना पुढील गैरवापरापासून वाचवणाऱ्या शिक्षिकेचे मी कौतुक करतो, असे ते म्हणाले. या घटनेमध्ये जर जोसेलिन सॅनरोमन दोषी आढळली तर तिला 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असेही ते पुढे म्हणाले.
Former teacher, at academy in Waterford, MI, charged with having sexual relationship with 16yo student in 2023. She was 24 at the time.
— Chuck Jackson (@NewsDeskChuck) June 30, 2025
According to prosecutor, the teacher (Jocelyn Sanroman) told another teacher of the relationship and that teacher informed law enforcement. pic.twitter.com/bOss8LPQBB
अमेरिकेत शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेने 14 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात शिक्षिकेला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेने दावा केला आहे की, तिच्या बॉयफ्रेंडच्या पादण्यामुळे तिला गेल्या ७ वर्षांपासून सायनस इन्फेक्शनचा त्रास होत आहे. या महिलेचे नाव क्रिस्टीन कॉनेल आहे, जी एक ट्रॅव्हल व्लॉगर आहे. तिने टिकटॉकवर हा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. शस्त्रक्रियेनंतर ती बेडवर झोपली असताना ही घटना घडली. चुकून तिचा बॉयफ्रेंडने चुकून तिच्या चेहऱ्यावर पादल्यामुळे तिची तब्बेत बिघडली. क्रिस्टीन म्हणाली की, सात वर्षांपूर्वी ती घोट्याच्या शस्त्रक्रियेतून बरी होत होती आणि त्यावेळी ती अंथरुणावर पडली होती, हालचाल करू शकत नव्हती. त्यानंतर तिच्या प्रियकरासह हॉटेलमध्ये राहत असताना एक विचित्र घटना घडली. गर्लफ्रेंड बेडवर चढत होती आणि त्याच वेळी तो तिच्या चेहऱ्याच्या दिशेने जोरात पादत होता. त्यावेळी क्रिस्टीनचा चेहरा थेट त्या दिशेने होता अशावेळी इच्छा असूनही ती स्वतःला दूर करु शकली नाही.क्रिस्टीन म्हणाली, "मला श्वासही घेता येत नव्हता, तो अनुभव इतका भयानक होता की, त्याबद्दल आता काही सांगणेही कठीण आहे. या घटनेनंतर काही काळातच तिला सतत सायनसचा त्रास होऊ लागला. नाक बंद होणे, चेहऱ्यावर वेदना होणे, हिरवा श्लेष्मा आणि वारंवार ताप येणे यासारख्या समस्या तिला वर्षानुवर्षे त्रास देत राहिल्या. तिने अनेक वेळा या त्रासावर डॉक्टरांकडून उपचार घेतले, स्कॅन केले. खूप औषधे घेतली तरी पण बरी झाली नाही. शेवटी, वैद्यकीय तपासणीत तिच्या सायनसमध्ये ई कोलाय बॅक्टेरिया आढळल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे हे बॅक्टेरिया सहसा स्टूलमध्ये आढळते.क्रिस्टीन म्हणते, "मला ही सगळी गोष्ट हसण्यावारी घेता आली , पण E.Coli सारखा जीवघेणा आणि घाणेरडा किटाणू नाकात कसे जातील. कुणी तुमच्या चेहऱ्यावर पादल्यावर अशा पद्धतीने त्रास होऊ शकतो. पण तिने हे देखील स्पष्ट केले की, तिच्या प्रियकराचा कोणताही वाईट हेतू नव्हता, तो फक्त बेडवर येत होता आणि दुर्दैवाने क्रिस्टीनचा चेहरा त्याच दिशेने होता. यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हैराण झाले.