Marathi News> विश्व
Advertisement

आईन्स्टाईनने 'देव' संकल्पनेवर लिहिलेल्या पत्राचा 20.52 कोटींना लिलाव; त्यात नेमकं आहे तरी काय?

Scientist albert einstein : शास्त्रज्ञ आणि त्यांचे विचार, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन कायमच साचेबद्ध चौकटींना शह देणारा असतो. आईनस्टाईनसुद्धा याच शास्त्रज्ञांच्या यादीतील एक...   

आईन्स्टाईनने 'देव' संकल्पनेवर लिहिलेल्या पत्राचा 20.52 कोटींना लिलाव; त्यात नेमकं आहे तरी काय?

Scientist albert einstein : जगामधील प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती, तिचं अस्तित्वं आणि कार्य यासंदर्भात शास्त्रज्ञांना अनेक प्रश्न पडले आणि त्याच प्रश्नांची उकल करताना या शास्त्रज्ञांनी कैक मुद्दयांवर संशोधन केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे महान शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांचं. 

एका दिशेला विज्ञान क्षेत्रात प्रचंड अनुभव असणारे आईनस्टाईन यांचे धर्म आणि देव या मुद्द्यांवरही आपली मतं ठामपणे मांडत होते. त्यांचे हेच विचार एका पत्रातही नमूद करण्यात आले होते, जे पत्र 2.9 मिलियन डॉलर अर्थात (20,52,47,500 रुपये) इतक्या किमतीला लिलावात निघालं. उपलब्ध माहितीनुसार 1954 मध्ये लिहिण्यात आलेल्या या पत्राचा उल्लेख 'गॉड लेटर' म्हणजेच देवावर लिहिण्यात आलेलं पत्र असा केला जातो. 

आईनस्टाईन यांनी जेव्हा हे पत्र लिहिलं तेव्हा त्यांचं वय 74 वर्षे इतकं होतं. जर्मनीचे दार्शनिक एरिक गुटकिंड यांच्या काही संदर्भांना आईनस्टाईन यांनी हे दीड पानांचं पत्र लिहिलं. विज्ञान आणि धर्मामध्ये असणाऱ्या वादावर या पत्राकडे अतिशय महत्त्वपूर्ण नजरेनं पाहिलं जातं. क्रिस्टी रॉकफेलर सेंटरकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार हे पत्र आईनस्टाईन यांच्या निधनाच्या वर्षभरापूर्वी लिहिण्यात आलं होतं. जिथं त्यांनी धर्म आणि देवाच्या साक्षात्कारासंदर्भात आपली स्पष्ट मतं मांडली होती. 

जर्मन भाषेत आईनस्टाईन यांनी या पत्रात काय लिहिलं? 

ज्या मंडळींचा धर्मावर विश्वास आहे, त्यांच्याविषयी आईनस्टाईन यांनी लिहिलं होतं, 'ईश्वर किंवा देव हा जो शब्द आहे तो माझ्यासाठी नगण्य असून तो इतरांच्या उणिवांतून तयार झालेला शब्द आहे. बायबल आदरणीय तर आहे, मात्र तो एक प्राचीन गोष्टींचा संग्रहमात्र आहे.' आईनस्टाईन पुढं लिहितात, कोणत्याही प्रकारची व्याख्या, मग ती सुक्ष्म का असेना, याविषयी त्यांचे विचार बदलू शकत नाहीत. 

आईनस्टाईन यांनी इथं त्यांच्या यहुदी धर्माविषयीसुद्धा चर्चा करत त्यावर अंधश्रद्धेचा संदर्भ दिला होता. ते म्हणतात, 'मला आनंद आहे की मी यहुदी समुदायाचा एक भाग आहे. मात्र हा धर्मही इतर धर्मांशिवाय वेगळा नाही.' आईनस्टाईन यांचे धर्म आणि देवाविषयीचे हे विचार अनेकांना पटले, कित्येकांनी त्यावर विचार केला, तर एक वर्ग असाही होता ज्यांना हे मत पटलं नाही. मात्र या पत्राची चर्चा फार झाली हेच खरं....

Read More