Marathi News> विश्व
Advertisement

आता त्वचेवरील चिपने आधीच ओळखता येईल कोरोना व्हायरस

याबद्दल माहिती करुन घ्या 

आता त्वचेवरील चिपने आधीच ओळखता येईल कोरोना व्हायरस

वॉशिंग्टन : पेंटागॉनच्या शास्त्रज्ञांनी (Scientists) एक मायक्रोचिप (Microchip) तयार केली आहे. ज्यामुळे कोरोना व्हायरसचे (Coronavirus) लक्षण दिसण्यापूर्वीच ती व्यक्ती ओळखता येते. चिपमुळे संबंधित व्यक्ती आधीपासूनच सावध राहते की त्याला कोरोनाला संसर्ग होऊ शकतो. ही चिप त्वचेच्या आत बसविली जाईल, त्यानंतर ही व्हायरस शोधण्यात आणि कोरोना संसर्ग रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, ही मायक्रोचिप कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवू शकते.

टिशू-सारखे जेलप्रमाणे उपकरण

खोकला, ताप आणि चव आणि गंध जाणे ही कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. पण या व्यतिरिक्त डोकेदुखी आणि थकवा यासारखे लक्षणे देखील कोरोनाची असू शकतात. बर्‍याच लोकांमध्ये, कोणतेही लक्षण न दिसूनही त्यांना कोरोना होतो. 'द सन' च्या अहवालानुसार, डिफेन्स एडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी ऑफ अमेरिका (DARPA) चा दावा आहे की, या उपकरणामुळे (Tissue-like Gel) लोकांना अनवधानाने व्हायरस पसरण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते. 

हे डिव्हाइस एक ऊतीसदृश जेल आहे, जे शरीरात फिट झाल्यानंतर आपल्या रक्ताची सतत तपासणी करेल असे यूएस आर्मीचे संसर्गजन्य रोग डॉक्टर मॅट हेपबर्न यांनी सांगितले. चिप त्याच्या शरीरात रासायनिक प्रतिक्रिया चालू असल्याचे संबंधित व्यक्तीला सतर्क करेल. कोविडची लक्षणे येऊ शकल्याचे त्याला आधी कळेल, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीस कोरोनापासून वाचण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. जगातील हे पहिले उपकरण असेल जे कोरोना होण्यापूर्वीच त्याचा शोध घेईल असेही ते म्हणाले. सध्या लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यूसारख्या उपाययोजना करुन कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होतोय. पण ही मायक्रोचिप सर्वात प्रभावी असल्याचे सिद्ध होईल असेही मॅट हेपबर्न म्हणाले.

Read More