Marathi News> विश्व
Advertisement

चोवीस तासांत अमेरिकेत आणखी एका ठिकाणी बेछूट गोळीबार

'या' ठिकाणी झाला हल्ला

चोवीस तासांत अमेरिकेत आणखी एका ठिकाणी बेछूट गोळीबार

मुंबई : चोवीस तासांच्या आत अमेरिकेत आणखी एका हल्ल्याची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेत असणाऱ्या ओहायो भागातील डेटन परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली असल्याचं वृत्त समोर येत आहे. या हल्ल्यात ९ जण ठार झाल्याची प्राथिमिक माहिती समोर य़ेत आहे. तर, १६जण यामध्ये जखमी झाले आहेत. सध्याच्या घडीला स्थानिक पोलीस यंत्रणा हल्लेखोराच्या शोधात आहे. 

ट्विटरच्या माध्यमातून डेटन पोलिसांकडून याविषयीची माहिती देण्यात आली. 'ऑरेगन येथे झालेल्या गोळीबारात दोषी असणाऱ्या शस्त्रधारी हल्लेखोलाचा आम्ही शोध घेत आहोत. सध्या या घटनास्थळी जाणं टाळा. याविषयीची अधिक माहिती लवकरच समोर येईल', असं ट्विट त्यांनी केलं. 

दरम्यान, शनिवारीसुद्धा अमेरिकेतील टेक्सास येथील वॉलमार्ट येथे एका २१ वर्षीय हल्लेखोराने बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यामध्ये जवळपास २० नागरिकांचा मृत्यू झाला. तर, २५ हून अधिकजण जखमी झाल्याचं वृत्त आहे. टेक्सासच्या इतिहासातील हा एक काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त करण्यात आली आहे. 

Read More