Marathi News> विश्व
Advertisement

जमिनीत सापडलंय गुप्तधन : तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

 थोडंथोडकं नव्हे, तर तब्बल ९९ टन सोनं सापडलंय. 

जमिनीत सापडलंय गुप्तधन : तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : गुप्तधनाचं आकर्षण तसं प्रत्येकालाच असतं पण एका देशालाच त्यांच्या जमिनीत गुप्तधन आढळून आलंय..टर्कीमध्ये थोडंथोडकं नव्हे, तर तब्बल ९९ टन सोनं सापडलंय. काही देशांच्या जीडीपीपेक्षा याची रक्कम जास्त होणार आहे. पश्चिम-मध्य टर्कीमधल्या सोगट भागात मोठं घबाड हाती लागलंय...  गुब्रेट्स फर्टिलायझर प्रॉडक्शन फर्म या कंपनीनं नुकत्याच खरेदी केलेल्या जमिनीत गुप्तधन सापडल्याचं जाहीर केलंय. कंपनीचे प्रमुख फहरेतीन पोयराझ यांनी दिलेल्या माहितीला अॅग्रीकल्चर कोऑपरेटीव्ह ऑफ टर्की आणि अनाडोलू या वृत्तसंस्थेनं दुजोरा दिलाय. 

या गुप्तधनात सापडलेल्या सोन्याचं वजन थोडंथोडकं नाहीये... तब्बल ९९ टन सोनं सापडलंय म्हणे. आजमितीस त्याची ६ अब्ज डॉलर्स किंवा ४४ हजार कोटी रुपये आहे.अनेक देशांचा GDPदेखील यापेक्षा कमी आहे.

वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, मालदीवचा जीडीपी आहे 4.87 अब्ज डॉलर्स, लिबेरियाचा 3.29 अब्ज आणि भूतानचा 2.53 अब्ज डॉलर्स एवढा जीडीपी आहे. 
3.17 अब्ज डॉलर्स जीडीपी असलेला बुरुंडी, 2.58 अब्ज जीडीपी असलेला लेसोथो हे देशही या गुप्तधनाच्या तुलनेत गरीबच आहेत. याखेरीज मॉरिटियाना, माँटेनेग्रो, बार्बाडोस, गयाना या देशांच्या अर्थव्यवस्थाही या सोन्याच्या तुलनेत दुबळ्याच आहेत.

२०१९मध्ये गुब्रेट्सनं ही जमीन खरेदी केली. त्यात एवढं गुप्तधन आढळून आल्यामुळे कंपनीचा आणखी एक फायदा झालाय. कंपनीच्या शेअर्सनी एका दिवसात १० टक्क्यांची उसळी घेतली... या सोन्यामुळे टर्कीची अर्थव्यवस्था सुधारायला मदत होणार आहे. पुढल्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्यानं हे सोनं बाहेर काढलं जाणार आहे.

Read More