Marathi News> विश्व
Advertisement

Explained : रिलायन्सहून 22 पट मोठी कंपनी; NVIDIA आहे तरी काय? गुंतवणुकदारांसाठी तर सोन्याची खाण

NVIDIA stock price: जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून NVIDIA मागील काही वर्षांमध्ये नावारुपास आली असून, या कंपनीच्या गुंतवणुकीतून अनेकजण मालामाल झाले आहेत.   

Explained : रिलायन्सहून 22 पट मोठी कंपनी; NVIDIA आहे तरी काय? गुंतवणुकदारांसाठी तर सोन्याची खाण

NVIDIA : एक लहानसं उपकरण तयार करणाऱ्या कंपनीनं पाहता पाहता इतकी उंची गाठली, की शेअर बाजारावर याच कंपनीचा दबदबा पाहायला मिळाला. होय! हीच वस्तूस्थिती आहे आणि ही किमया करणारी कंपनी आहे NVIDIA. 

NVIDIA नं ऐतिहासिक कागिरी केलं असं म्हणणं गैर ठरणार नाही, कारण या कंपनीचा मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलरपरिकडे गेला असून, अमेरिका, जर्मनी आणि चीनला सोडलं तर, NVIDIA चा मार्केट कॅप इतर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पुढेच आहे हे आकडे स्पष्ट सांगत आहेत. इथं भारत सातत्यानं जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ पाहत असतानासुद्धा देशाची अर्थव्यवस्था NVIDIA च्या मार्केट कॅपच्या मागेच असल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत पाहायचं झाल्यास अमेरिकेच्या GDP चा आकडा 29 ट्रिलियन डॉलरहून जास्त आहे, दुसऱ्या क्रमांकावर 18.7 ट्रिलियन डॉलरसह चीन असून तिसऱ्या क्रमांकावर 4.66 ट्रिलिय़न डॉरसह जर्मनी हा देश आहे. यानंतर आता 4 ट्रिलियन डॉलरसर चौथा क्रमांक NVIDIA नं पटकावला आहे असंच म्हणावं लागेल. थोडक्यात भारताच्या अर्थव्यवस्थेलाही या कंपनीनं मागे टाकलं आहे. 

रिलायन्सलाही टाकलं मागे...

भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावाजलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)चा मार्केट कॅप 20.53 लाख कोटी रुपये असला तरीही NVIDIA चा मार्केट कॅप हा त्यांच्या 22 पटींनी जास्त आहे, तर TCS चा मार्केट कॅप 37 पटींनी जास्त आहे हे आकडेवारीतून स्पष्ट होतंय. मे 2023 मध्ये NVIDIA नं 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर 9 महिन्यांनी कंपनीचा मार्केट कॅप 2 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला. पुढे अवघ्या 4 महिन्यांतच त्यात 1 ट्रिलियनची भर पडली आणि जवळपास वर्षभरानंतर म्हणजेच जुलै 2025 मध्ये कंपनीचा मार्केट कॅप थेट 4 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला. 

NVIDIA कंपनी नेमकं करते काय? 

NVIDIA कंपनीटी सुरुवात 2013 मध्ये झाली आणि या कंपनीचं मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये असल्याचं सांगण्यात येतं. चिप तयार करण्यापासून ते ग्राफीक्स प्रोसेसिंग युनिट, सिस्टीम ऑन चिप युनिट आणि एआस क्षेत्रात ही कंपनी सक्रिय असून उल्लेखनीय कामगिरी करत आहे. 2015 पर्यंत ही कंपनी GeForce GPUs साठी ओळखली जात होती. गेमिंग आणि वर्कस्टेशनमध्ये कंपनीचं वर्चस्वं होतं आणि त्यातूनच मिळकतीचा 82 टक्के भाग निघत होता. 

हेसुद्धा वाचा : दसरा, दिवाळी... सारंकाही! 4.20 रुपयांच्या शेअरमधून 64000% घसघशीत परतावा; गुंतवणूकदार झटक्यात कोट्यधीश

 

गेल्या 15 वर्षांमध्ये या कंपनीनं गुंतवणुकदारांना मालामाल केलं असून दरवर्षी सरासरी 70 टक्के परतावा गुंतवणुकदारांना देऊ केला आहे. 2013 पासून आतापर्यंत फक्त दोन वर्षं अशी होती जेव्हा कंपनीचे शेअर निगेटिव रिटर्नमध्ये होते. ही अपवादात्मक वर्ष वगळता उर्वरित सर्वच वर्षांसाठी कंपनीचे शेअर गुंतवणुकदारांसाठी जणू सोन्याची खाण ठरले आहेत असं म्हणणं गैर नाही. 

(शेअर बाजारात गुंतवणूक जोखमीची असून कोणत्याही वृत्ताची खातरजमा झी 24 तास करत नाही. गुंतवणूकविषयक निर्णयांसाठी आर्थिक सल्लागार आणि जाणकारांची मदत घ्या.)

Read More