Marathi News> विश्व
Advertisement

'ही' आहे इस्त्रायलमधील सर्वात श्रीमंत महिला; ₹5160000000 ची मालकीण काय काम करते?

Isreal Richest Women : सध्या इराण - इस्त्रायलमधील युद्धामुळे तणाव आहे. पण इस्त्रायलमधील 'अंबानी' महिलेची जोरदार चर्चा होतेय. ₹5160000000 मालकीणचं नाव काय आणि त्या काय करतात पाहूयात.     

'ही' आहे इस्त्रायलमधील सर्वात श्रीमंत महिला; ₹5160000000 ची मालकीण काय काम करते?

Isreal Richest Women : इराण-इस्रायल युद्धामुळे जगात तणाव निर्माण झाला आहे. त्यात आता अमेरिकानेही उडी मारल्यामुळे युद्धची परिस्थिती अधिक भीतीदायक झाली आहे. या युद्धात कधी इस्त्रालयचा वरचष्मा तर कधी इराणचा, पण नेमकं या युद्धातून काय होणार हे कोणाला माहिती नाही. हे युद्ध फार काळ चालल्यास अनेक देशाला याचा फटका बसणार आहे. या युद्धातही एक महिलेची सोशल मीडियावर विशेष चर्चा सुरु आहे. ही महिला इस्रायलची 'अंबानी' आहे असं म्हणतात. या इस्रायलच्या सर्वात श्रीमंत महिला असून त्यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. 

कोण आहे ही महिला आणि त्या काय करतात, याबद्दल जाणून घेऊयात. श्रीमंत असलेली ही महिला कोणता व्यवसायक करते पाहूयात. इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला शरी एरिसन असं तिचं नाव आहे. शरी ही एरिसन इन्व्हेस्टमेंट्सची मालक असून ती परोपकारी असल्याचं सांगतिलं जातं. तिच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तिची एकूण मालमत्ता सुमारे 5.96 अब्ज डॉलर्स  भारतीय रुपयानुसार 5.16 लाख कोटी असल्याचा अंदाज आहे.

शारीला ही संपत्ती तिचं वडील टेड एरिसन यांच्याकडून वारशाने मिळाली, जे कार्निव्हल क्रूझ लाइन्सचे संस्थापक होते. त्यानंतर शारीने तिच्या व्यवसायाच्या बळावर ती आणखी पुढे नेला. शारी एरिसन तिच्या उत्कृष्ट व्यावसायिक जाणिवेसाठी ओळखली जाते. तिचे अनेक व्यवसाय असून यामध्ये हवामान, पाणी, अन्न तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करणारे एरिसन इन्व्हेस्टमेंट्स समाविष्ट आहेत. तिने टेड एरिसन फॅमिली फाउंडेशनची देखील स्थापना केली, जी विविध परोपकारी संस्थांना मदत करते. 

इस्रायल बँकेशीही संबंध!

पूर्णवेळ व्यवसायात येण्यापूर्वी, शारी एरिसनची इस्रायलच्या सर्वात मोठ्या बँकेत, बँक हापोआलिममध्ये मोठी भागीदारी होती. शिकुन अँड बिनुई या मोठ्या बांधकाम आणि रिअल इस्टेट कंपनीचीही मालकी होती. तिने बँकेतील तिचे काही शेअर्स विकले आणि शिकुन अँड बिनुईवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे तिला भरपूर पैसे मिळाले. तिने या नफ्यातील काही भाग तिचा व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी वापर केला आहे. 

Read More