Marathi News> विश्व
Advertisement

भयावह! अमेरिकेतून बाहेर काढल्यानंतर भारतीयांसह 300 जण पनामात कैद; हॉटेलच्या खिडकीतून मागतायत मदत

Us Deportation: बापरे! तुम्ही इथं निवांत आयुष्य जगत असताना जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर नेमकं काय सुरुय माहितीये? कसा सुरुय मदतीसाठीचा संघर्ष? पाहा जागतिक स्तरावरील मोठी बातमी   

भयावह! अमेरिकेतून बाहेर काढल्यानंतर भारतीयांसह 300 जण पनामात कैद; हॉटेलच्या खिडकीतून मागतायत मदत

Us Deportation: जागतिक स्तरावर सध्या अनेक घडामोडी घडत असून त्याचे दूरवर पडसाद उमटताना दिसत आहेत. अमेरिकेतही सध्या अशा कैक घडामोडी घडत असून, साऱ्या जगाचं लक्ष या घडामोडींवर लागून राहिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प या महासत्ता राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर या देशात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणाऱ्या अनेकांनाच देशाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यामध्ये शेकडो भारतीयांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळालं. 

नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार ट्रम्प प्रशासनानं निर्वासित ठरवत बाहेरचा रस्ता दाखलेल्या जवळपास 300 प्रवाशांना अस्थायी स्वरुपात मध्य अमेरिकी देश पनामा इथं एका हॉटेलमध्ये कैद ठेवलं आहे. आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या वतीनं कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळं ती व्यवस्था होईपर्यंत हे बेकायदेशीरररित्या वास्तव्यासाठी कैदेत असणारे प्रवासी तोपर्यंत देश सोडू शकणार नाहीयेत. याचदरम्यान नजरकैदवजा परिस्थितीत हॉटेलमध्ये फसलेल्या या प्रवाशांकडून हॉटेलांच्या खिडक्यांमधून मदत मागितली जात असल्याची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

'आम्ही सुरक्षित नाही आहोत... मदत करा'
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ताब्यात असणाऱ्या प्रवाशांपैकी जवळपास 40 टक्के आणि त्याहून जास्त प्रवासी आपल्या मूळ देशात परतू इच्छित नाहीत. तर, काही प्रवासी हातात संदेश लिहिलेले फलक घेऊन हॉटेलच्या पारदर्शी खिडक्यांमध्ये उभे असल्याची छायाचित्र व्हायरल होत आहेत. 'मदत करा, आम्ही देशात सुरक्षित नाही आहोत' असं या फलकांवर लिहिण्यात आलं आहे. 

उपलब्ध माहितीनुसार हे प्रवासी भारत, नेपाळ, ईराण, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि चीन या आशियाई देशातील असून अमेरिकेलाही या प्रवाशांना थेट त्यांच्या मूळ देशी पाठवण्यामध्ये काही अडचणी येत आहेत. या संपूर्ण पेचाच्या स्थितीमध्ये पनामाला सध्या ट्रांजिट पॉईंट म्हणून वापरात आणलं जात आहे. तेथील सुरक्षा मंत्री फ्रँक एब्रेगो यांच्या माहितीनुसार या प्रवाशांना भोजनासह प्रथमोपचाराच्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. 

हेसुद्धा वाचा : दबक्या पावलांनी पाऊस परततोय? राज्यात कधी थंडी, कडी उष्णतेचा वाढता दाह; अवघ्या 24 तासात कितीदा बदलणार हवामान? 

अमेरिका आणि पनामा यांच्यात झालेल्या एका तहाअंतर्गत ही व्यवस्था केली जात असून, या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणारी आर्थिक मदत अमेरिकेकडून पुरवली जात आहे. एकिकडे ही स्थिती असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर मदत मागणाऱ्या प्रवाशांचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामुळं ही माणसं कैद असल्याचं म्हटलं जात आहे. पण, पनामाच्या सुरक्षारक्षकांच्या माहितीनुसार मात्र ही माणसं कैद नसून, त्यांना फक्त खोलीबाहेर येण्याची परवानगी नाही. ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस सुरक्षा तैनात असून, पनामाच्या मानवाधिकार विभागाच्या वतीनं प्रवाशांच्या या स्थितीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली जाण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. अनेक मानवाधिकार संघटांच्या अनुषंगानं व्यक्तीला अशा पद्धतीनं बंदी करून ठेवणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करण्याचं कृत्य असल्यामुळं येत्या काळात हा वादाचा विषय ठरु शकतो. 

Read More