Marathi News> विश्व
Advertisement

विध्वंसाचे संकेत! रशियात 8.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, जगाला त्सुनामीचा धोका; भारताजवळील समुद्रातही उलथापालथ...

Russia Earthquake Japan Tsunami alert : त्राहिमाम! जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? जपानमध्ये संकटांचे पूर्वसंकेत मिळण्यास सुरुवात.   

विध्वंसाचे संकेत! रशियात 8.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, जगाला त्सुनामीचा धोका; भारताजवळील समुद्रातही उलथापालथ...

Russia Earthquake Japan Tsunami alert : रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात तब्बल 8.7 रिश्टर स्केल इतक्या अतिप्रचंड तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप आल्याचं वृत्त आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी 8.25 वाजता हा महाभयंकर भूकंप आला. त्याचा केंद्रबिंगू समुद्राच्या उदरात असल्या कारणानं या भूकंपानंतरही त्याच्या तीव्रतेचे परिणाम थेट रशिया, जपान, गुआम, हवाई आणि अलास्कापर्यंत दिसणार असून या देशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार पॅसिफिक महासागरामध्ये सागरी लाटा अक्राळविक्राळ रुप धारण करून शहरांवर धडकण्याची भीतीसुद्धा व्यक्त करत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. 

“आजचा भूकंप गंभीर होता आणि गेल्या काही दशकांमधील भूकंपांमध्ये हा सर्वात मोठा होता,”  असं कामचटका राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय जिथं त्यांनी एका बालवाडीचं नुकसान झाल्याची माहिती दिली. 

भूकंपानंतर लगेचच त्सुनामी?

रशियाच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागात असणाऱ्या कामचटका द्वीपकल्पाच्या क्षेत्रात समुद्रात 3 ते 4 मीटर उंचीच्या त्सुनामीसम लाटा उसळून समुद्रही खवळल्याची माहिती आपत्कालीन परिस्थितीचे प्रादेशिक अधिकारी सर्गेई लेबेदेव दिली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

जपानी बाबा वेंगाच्या त्या भविष्यवाणिच्या दिशेनं पहिलं पाऊल? (Japani Baba Venga)

जपानमधील त्सुनामीची चर्चा मागील काही दिवसांपासून सातत्यानं सुरू असून त्यास कारण ठरत आहे ती म्हणजे जपानी बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी. मंगा आर्टिस्ट रियो तात्सुकी यांनी 1999 मध्ये "The Future I Saw" या पुस्तकामध्ये जपानमधील त्सुनामीचं भाकित लिहिलं होतं, या त्सुनामीचं स्वरुप 2011 च्या संकटाहून गंभीर असेल असंही म्हटलं होतं. ज्यामुळं हे विध्वंसाचे संकेत तर नाहीत? असा भीतीदायक प्रश्नसुद्धा सध्या सामान्यांच्या मनात घर करत आहे. 

भारतातही त्सुनामीसम परिस्थिती? देशाला कितपत धोका? 

रशियामध्ये भूकंप येण्यापूर्वी मंगळवार, 29 जुलै रोजी बंगालच्या उपसागरामध्येही 6.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता. भारतीय प्रमाण वेळेनुसार 00:11:50 वाजचा हा भूकंप आला असून, त्याचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून 10 किमी खोलवर असल्याचं सांगण्यात आलं. ज्यानंतर काहीच वेळानं रात्री 12:12 वाजता आणखी एका जबर भूकंपानं अंदमान आणि निकोबार बेट समुह हादरला. मात्र या भूकंपामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नसून, तूर्तास सागरी उलथापालथीव्यतिरिक्त त्सुनामीचा इशारा मात्र जारी करण्यात आला नव्हता. 

दरम्यान, रशियातील या महाभयंकर भूकंपानंतर जपानच्या एनएचके या स्थानिक माध्यमानुसार हा भूकंप जपानच्या होक्काइडोपासून साधारण 250 किमी दूर होता. ज्याचा केंद्रबिंदू कामचटकाच्या पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्कीपासून 133 किमी दक्षिण पूर्वेला होता. या जबर हादऱ्यानंतर जपानसह कॅलिफोर्नियासह अमेरिकेच्या 4 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमेरिकेतील अलास्का येथील राष्ट्रीय त्सुनामीचाही इशाहा देण्यात आला आहे. अलास्कन अलेउशियन बेटांच्या काही भागांसह कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि हवाईसह पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामध्ये अलास्काच्या किनारपट्टीचा मोठा भागही समाविष्ट आहे. 

जपानमध्ये वारंवार का येतात भूकंप? 

जपान हा 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर'चा भाग आहे. हा जगातील सर्वात भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. मुळात पृथ्वीचा पृष्ठभाग प्रामुख्याने 7 मोठ्या आणि अनेक लहान टेक्टोनिक प्लेट्सने तयार झाला आहे. हे थर सतत तरंगत असून अनेकदा एकमेकांवर आदळतात. ज्यामुळं या थरांचे कोपरे वाकतात आणि जास्त दाबामुळे ते तुटू लागतात. अशा परिस्थितीत, भूगर्भातून येणारी ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते आणि भूकंप येतो. 

ग्वाटेमालामध्येही भूकंपाचे धक्के 

रशियातील भूकंपामागोमाग तिथं ग्वाटेमालामध्येही भूकंपाचे मोठे धक्के जाणवले, एल साल्वाडोर सीमेजवळ सलग दोन भूकंप झाल्यामुळे देशभरातील अनेक इमारतींमधून लोकांना बाहेर काढण्यास भाग पाडले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने २१:२१ UTC वाजता पहिला भूकंप ५.६ तीव्रतेचा नोंदवला, ज्याचे केंद्रबिंदू ग्वाटेमालाच्या जेरेझच्या पश्चिम-वायव्येस ३ किमी अंतरावर ७.८ किमी खोलीवर होते. सुरुवातीला ५.३ तीव्रतेचा दुसरा भूकंप नोंदवला गेला आणि त्यानंतर लगेचच धक्के बसले.

 

 

 

Read More