Marathi News> विश्व
Advertisement

World Record : 24 वर्षानंतर Snow Baby चा जन्म

अमेरिकेतील आयवीएफ म्हणजे कृत्रिम गर्भधारणेद्वार आणखी एक नवा रेकॉर्ड तयार केलेला आहे.

World Record : 24 वर्षानंतर Snow Baby चा जन्म

मुंबई : अमेरिकेतील आयवीएफ म्हणजे कृत्रिम गर्भधारणेद्वार आणखी एक नवा रेकॉर्ड तयार केलेला आहे.

24 वर्षापूर्वी फ्रिजमध्ये ठेवलेल्या एका भ्रूणामार्फत बाळाचा जन्म झाला आहे. गर्भधारणा आणि बाळाचा जन्मा यातील हे सर्वात मोठे अंतर आहे. या बाळाचं नाव एमा रेना गिब्सन असं ठेवण्यात आलं आहे. या बाळाच्या भ्रृणाला टीना गिब्सन नावाच्या महिलेच्या गर्भात ठेवण्यात आले आहे. या बाळाने नोव्हेंबर महिन्यात जन्म घेतला आहे.

टीनाने या बाळाच्या जन्माच्यावेळी म्हटलं की तुम्हाला अंदाज येईल की मी फक्त 25 वर्षाची आहे. हे भ्रूण आणि मी आज चांगले मित्र झाले असतो. त्यामुळे या बाळातील अंतर खूप महत्वाचं ठरत आहे. टिना पुढे सांगते की, मला एका बाळाला जन्म द्यायचा होता. पण मला माहित नव्हतं की हा एक विश्व रेकॉर्ड होऊ शकतो. 

fallbacks

टीनाने बाळासाठी येथील राष्ट्रीय भ्रृणदान केंद्र म्हणजे नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटरशी संपर्क केला होता. या केंद्रात भृणाला बर्फात जमा केले जाते. आणि यामुळेच हे भ्रृण खूप काळ जीवंत राहते. या बाळांना आपण स्नो बेबी बोलू शकतो. एम्ब्रियो डोनेशन सेंटरमधून जे दाम्पत्य बाळाला जन्म देऊ शकत नाही त्यांच्यासाठी खास भ्रृण सुरक्षित ठेवले जातात. 

टीनाचा नवरा बेंजामिन गिब्सन बाळाला जन्म देण्यासाठी सक्षम नव्हते. यामुळे त्यांनी हे भ्रृण दान घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी या दाम्पत्याला अनेक चौकशीमधून जावे लागले. मार्च महिन्यात टीनाच्या पोटात भ्रृण ठेवण्यात आले. त्यानंतर तिने नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म दिला. या बाळाच्या अगोदर 20 वर्षाच्या भ्रृणाने जन्म घेतल्याचा रेकॉर्ड आहे. 

Read More