Marathi News> विश्व
Advertisement

सहारा वाळवंट नव्या कारणामुळे चर्चेत, निसर्गाचा असा चमत्कार !

सौदी अरेबियातले सहारा वाळवंट ( Sahara Desert) जगप्रसिद्ध आहे. मात्र आता सहारा वाळवंट एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहे.  

सहारा वाळवंट नव्या कारणामुळे चर्चेत, निसर्गाचा असा चमत्कार !

मुंबई : सौदी अरेबियातले सहारा वाळवंट ( Sahara Desert) जगप्रसिद्ध आहे. मात्र आता सहारा वाळवंट एका नव्या कारणामुळे चर्चेत आलं आहे. त्या कारणाची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. मात्र ते प्रत्यक्षात घडले आहे. सौदी अरेबियातले (Saudi Arabia) सहारा हे जगातलं सर्वात उष्ण वाळवंट. ओसाड, उजाड आणि रणरणतं वाळवंट ही सहाराची जगप्रसिद्ध ओळख. मात्र इथे वेगळेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गरम वाफा सोडणारं सहारा वाळवंट चक्क थंडगार झाले. ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना. पण हे खरं आहे. (Snowfall In Sahara Desert)  

सहारा वाळवंटात चक्क बर्फवृष्टी झाली. (Snow falls in the Sahara desert ) वाळूचे साम्राज्य असलेल्या सहारा वाळवंटात थोडा थोडका नव्हे तर तब्बल 16 इंच इतका बर्फाचा थर पडला. सौदी अरेबियातील अल खली वाळवंटात ही जोरदार बर्फवृष्टी झाली. नागरिकांसोबतच उंटांना सुद्धा या बर्फवृष्टीचा सामना करावा लागला. बर्फवृष्टीमुळे या भागातील तापमान दोन डिग्री सेल्सीअसपेक्षाही खाली घसरलेले पाहायला मिळाले. या बर्फवृष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मानवी हस्तक्षेपामुळे हवामानात बदल होत आहे. वातावरणातील कार्बनची पातळी जसजशी वाढत जाईल तसं उष्ण आणि थंड तापमान होऊ शकतं असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

निसर्ग कधीच अचानक आघात करत नाही. आधी तो काही संकेत देतो. त्यानेही मानवी समाज सुधारला नाही, तर मात्र निसर्ग दणका देतो. सहारा वाळवंटात बर्फवृष्टी ही त्याचीच झलक मानली जात आहे. त्यामुळे आता गरज आहे ती मानवाने वेळीच सावध होण्याची. 

Read More