Black Hole NASA: ब्रह्मांड.... आजच्या घडीला मानवाला जी पृथ्वी नजरेस पडते, जे आयुष्य सजीवसृष्टी जगते ही एक मोठी प्रक्रिया असून त्यामागे अब्जावधी वर्षांचा इतिहास आणि एक नैसर्गिक क्रिया आहे. या दरम्यानच्या काळात कैक ग्रह नाश पावले, कैक नव्यानं जन्मास आले, अनेक ताऱ्यांची उत्पत्ती आणि ऱ्हासही झाला. इतकंच नव्हे, तर आकाशगंगांमध्ये झालेल्या अतिप्रचंड टक्करीमुळं अंतराळात सातत्यानं काही बदल होत राहिले.
इतकंच नव्हे, तर आकाशगंगा एकमेकांवर आदळल्यानं त्यांच्या केंद्रांमध्ये असणाऱ्या अतिप्रचंड ब्लॅकहोलचासुद्धा विलय होत गेला. आतासुद्धा संशोधकांनी अशीच एक महत्त्वाची बाब समोर आली असून, दोन आकाशगंगा एकमेकांवर आदळणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या हबल दुर्बिणीनं MCG-03-34-64 नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी 3 वेगवेगळ्या प्रकारचा तीव्र उजेड पाहिला गेला. यामधील 2 प्रकारचे उजेड अवघ्या 300 मिलियन प्रकाशवर्षे अंतरावर होते. यासंदर्भातील सखोल निरीक्षणानंतर हे ब्लॅक होल एकमेकांच्या जवळ येत असल्याची बाब लक्षात आली. हे आकारानं अतिप्रचंड असणारे ब्लॅकहोल 100 मिलियन वर्षांनंकर एकमेकांवर आदळून मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.
आकाशगंगा आणि त्यातील ब्लॅक होल एकमेकांवर आदळण्याची घटना ब्रह्मांडात सुरुवातीपासूनच होत असून आकाशगंगेच्या विकासासाठी या किंवा तत्सम घटना अतिशय महत्त्वाच्या असल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे, तर पृथ्वीचं अस्तित्वं असणारी आकाशगंगासुद्धा आजुबाजूला असणाऱ्या आकाशगंगांवर निशाणा साधत आहे. इतकंच नव्हे तर, शेजारी असणाऱ्या
एंड्रोमेडा आकाशगंगेवरही या आकाशगंगेची टक्कर होणार असून या घटनेसाठी कोट्यवधी वर्षांचा कालावधी लागू शकतो.
नासानं सध्या ज्या 2 ब्लॅकहोलमधील आदळण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष वेधलं आहे त्या दोघांचं स्थान आपआपल्या आकाशगंगांच्या केंद्रस्थानी आहे. जसजशी आकाशगंगा जवळ येत जाईल तसतसा या ब्लॅक होलमधील संपर्क वाढून एका महाभयंकर स्फोटातून ते एकमेकांत विलीन होतील.