Space Science News: पृथ्वीचं अस्तित्वं असणाऱ्या सूर्यमालेमधील सर्वात उष्ण आणि पृथ्वीच्या जवळचा तारा हाच या ग्रहावरील मुख्य उर्जास्त्रोत आहे. हाच सूर्य कैक वर्षांपासून सूर्यमालेत आपलं अस्तित्वं अबाधित ठेवत असून, त्यातील बदलांमुळं इतरही ग्रहांच्या भौगोलिक आणि खगोलीय रचनांमध्ये बदल दिसून येतात. सूर्यावरील घडामोडी आणि होणारे सौरस्फोट यांच्यामुळं होणाऱ्या संभाव्य स्फोट आणि विध्वंसाचं परीक्षण संशोधकांकडून सुरू असतानाच अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) नं पुन्हा एक कमाल केली आहे.
सूर्याचं अतिप्रचंड उष्ण तापमान आणि त्यामुळं उद्भवणारी एकंदर परिस्थिती पाहता नासाच्या पार्कर सोलार प्रोबनं एक अविश्वसनीय कामगिरी केली आहे (Parker Solar Probe). जिथं नासाच्या सोलार प्रोबनं सुर्याभोवती परिक्रमण करत त्याची अशी काही छाया टिपली जी आतापर्यंत कोणीच कधीही पाहिली नव्हती. नासानं जारी केलेल्या या व्हिडीओमध्ये सुर्याच्या तप्त ज्वाळांचा होणारा स्फोट आणि त्यांची दाहकता पाहून धडकी भरत आहे.
24 डिसेंबर 2024 ला पार्कर सोलार प्रोबनं आतापर्यंत सुर्याच्या अतिशय जवळ जाण्यासाठीचं उड्डाण भरं. त्यावर असणाऱ्या ऑनबोर्ड कॅमेरा सिस्टम WISPR (Wide-field Imager for Parker Solar Probe) नं सूर्याच्या धगधगत्या Coronal Mass Ejection चे काही क्षण टिपले आणि संपूर्ण जगासह संशोधक वर्गालाही थक्क केलं.
दरम्यान, Johns Hopkins Applied Physics Laboratory चे शास्त्रज्ञ Angelos Vourlidas यांच्या माहितीनुसार एकामागून एक CME आदळल्यानंतर कशा प्रकारे एकमेकांमध्ये विलीन होतात हे साऱ्या जगासह शास्त्रज्ञांनीसुद्धा पहिल्यांदाच पाहिलं. या संशोधनातून अवकाशातील हवामान बदल नेमके कसे होतात यातही मदत मिळणार आहे.
सूर्याची झलक टीपण्यासाठी पाठवण्यात आलेला पार्कर प्रोबवर तब्बल 1300 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाचा मारा आणि काही घातक रेडिएशनचाही मारा झाला. मात्र त्यातूनही नासाची ही मोहिम बचावली आणि यशस्वी कामगिरी करून गेली. NASA कडूनही ही एक चमत्कारी घटना असल्याचं म्हणत पुढील पार्कर प्बोर फ्लायबाय 25 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून हा टप्पा सुर्याच्या आणखी जवळ नेण्यासाठी असेल असं स्पष्ट केलं.