Space News : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था, नासा (NASA) कडून आतापर्यंत या क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण कामगिरी करण्यात आली आहे. विविध अवकाश मोहिमा असो किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर अंतराळात मानवी अस्तित्वं शोधण्यासाठी आणि इतर ग्रहांच्या अभ्यासासाठी सुरू असणारी धडपड असो, जिथं अवकाशाचा विषय निघतो तिथं नासाचाही उल्लेख निर्विवादपणे होतो. अशा या संस्थेनं एक नवा दावा करत संपूर्ण जगाचंच नव्हे, तर ब्रह्मांडाचं लक्ष वेधलं आहे.
नासानं पृथ्वीसारखाच आणखी एक ग्रह शोधला असून हा ग्रह पृथ्वीपासून 154 प्रकाशवर्षेच दूर असल्याचं सांगितलं जात आहे. (Super Earth) 'सुपर अर्थ' असं या ग्रहाचं नाव असून, तिथून पृथ्वीच्या दिशेनं सातत्यानं काही रहस्यमयी संकेत आणि खुणा येत असल्याची माहिती नासानं प्रसिद्ध केली आहे. TOI‑1846 b असं या ग्रहाला देण्यात आलेलं शास्त्रीय नाव असून, या वर्षाच्या सुरुवातीलाच नाराच्या 'ट्रान्झिस्टींग एक्सोप्लॅनेट सर्वे सॅटलाईट' (TESS) नं सातत्यानं लुकलुकणारा एक तारा किंवा तत्सम अवकाश वस्तू हेरल्याचं वृत्तही 'द सन'नं प्रसिद्ध केलं होतं.
यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात एक लुकलुकणारा प्रकाश अवकाशात पाहिला गेला. संशोधकांनी जेव्हा त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना उत्तरेकडील आकाशामध्ये TOI‑1846 b लायरा नक्षत्रात 'सुपर अर्थ' नजरेस पडली.
प्राथमिक निरीक्षणानुसार या नव्या ग्रहावर वातावरणाच्या एका पातळ थराखाली बर्फाची जाडसर चादर असल्याचं म्हटलं जात आहे. इथं समुद्र असण्याची शक्यतासुद्धा नाकारण्यात येत नाही. या ग्रहाच्या पृष्ठाचं तापमान 300 अंश सेल्सिअस असलं तरीही संशोधकांच्या अंदाजानुसार इथं पाणी अस्तित्वात आहे. ज्यामुळं या ग्रहाची एक बाजू कायम त्याच्या ताऱ्याच्या दिशेनं दिसते. सोप्या शब्दांत सांगावं तर भरती- ओहोटीचं चक्र तिथंही अस्तित्वात असावं.
नन्यानं समोर आलेल्या या ग्रहाच्या पृष्टाभोवती नेमकी किती उष्णता आहे हे पाहता तिथं जीवसृष्टीचं अस्तित्वं किंवा त्याची फार कमी शक्यता वर्तवण्यात येते. Abderahmane Soubkiou यांनी मोरोक्को येथील वेधशाळेतून या नव्या ग्रहाची माहिती देत या प्रक्रियेत त्यांना चार खंडामधील संशोधकांची मदत मिळाल्याचं सांगितलं. तर, नासाच्या संशोधकांनी आता जेम्स वेब दुर्बिणीच्या वापरातून या ग्रहाविषयी आणखी सखोल माहिती मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.